Kesar Mango Agrowon
ॲग्रो विशेष

Kesar Mango Season: यंदा केसर आंब्याचा हंगाम उशिरा!

Mango Season Delay: मराठवाड्यासह राज्यात यंदा केसर आंब्याचा हंगाम १५ दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. थंडीचा ‘शॉक’, तापमान बदल आणि पॅक्लोब्युट्राझोल वापरलेल्या बागांतील मोहर लांबल्याने हा परिणाम झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Chhatrapati Sambhajinagar News: मराठवाड्यासह राज्यातील केसर आंब्याचा हंगाम यंदा पंधरा दिवस लांबणीवर पडण्याचा अंदाज आहे. यंदा पाऊस चांगला झाला. मध्यंतरी सात-आठ दिवसांतील थंडीच्या ‘शॉक’ आणि पॅक्लोब्युट्राझोल दिलेल्या बागांमधील मोहराचा कालावधी लांबल्याने हा परिणाम झाल्याचे आंबा तज्ज्ञ डॉ. भगवानराव कापसे म्हणाले.

राज्यात कोकण वगळता सुमारे ६५ हजार हेक्टरवर केसर आंब्याची लागवड आहे. त्यापैकी दहा ते बारा हजार हेक्टरवरील केसर आंबा बागा चांगल्या उत्पादनक्षम आहेत. साधारणपणे सोलापूर, सांगली, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर तसेच मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांसह विदर्भ, खानदेश, पश्‍चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये केसर आंब्याची लागवड मोठ्या प्रमाणात आहे.

अलीकडे आंब्याचे उत्पादन व्यावसायिक दृष्टिकोनातून घेण्याच्या अनुषंगाने शेतकरी विविध उपाय योजत आहेत. डॉ. कापसे यांच्या माहितीनुसार, यंदा साधारणतः जुलै, ऑगस्टमध्ये पॅक्लोब्युट्राझोल वापरलेल्या केसर आंबा बागांमध्ये नोव्हेंबरमध्ये मोहोर अपेक्षित होता, परंतु हा कालावधी थोडेसा लांबला आहे. त्यातही सुरुवातीला लागलेला मोहर उमलताना थंडीचा शॉक लागल्यावर परपरागीकरणाची प्रक्रिया अपेक्षेनुसार झाली नाही, त्यामुळे काही मोहर जळाला.

इतर मोहर मात्र उत्तमरीत्या तयार झाला. यंदा फारशी थंडी नसल्याने केसर आंबा झपाट्याने वाढतो आहे. त्याची आकारही चांगला असण्याची आशा आहे. १५ फेब्रुवारीनंतर तापमान ३५ अंश सेल्सिअसच्यावर गेल्याने फळगळ वाढण्याची शक्यता आहे. सध्याच्या काळात बागेतील आर्द्रता टिकविण्यासाठी एक ते दोन मोकळे पाणी द्यावे. नैसर्गिक आपत्ती वगळता उन्हाचा चटका वाढला तर फळांचा आकार लहान होण्याची शक्यता आहे. त्यासाठी बँगिंगचा पर्याय शेतकरी निवडू शकतात. यामुळे फळाचा आकार वाढण्यासोबतच फळमाशीवर नियंत्रित करता येऊ शकेल.

आमच्या केसर आंबा बागेतील काही फळे लिंबू आकाराची तर काही त्यापेक्षा लहान आहेत. दोन-तीन टप्प्यांत आलेला मोहर आणि तापमान वाढीमुळे फळगळीचा फटका बसतो आहे. गत वर्षीच्या तुलनेत यंदा हंगाम चांगला राहण्याची आशा आहे.
दिनेश गुगळे, आंबा उत्पादक, देडगाव,ता. नेवासा, जि. अहिल्यानगर
लहान-मोठी केसर आंब्याची ३३०० कलमे आहेत. यंदा वातावरण पोषक असून मोहराचा हंगाम लांबल्याने १५ मेपासून फळे काढणीला येतील.
गजानन कऱ्हाळे, खानापूर, ता. जाफराबाद, जि. जालना
आजवरचे पोषक वातावरण पाहता ते कायम पोषक राहिल्यास गत वर्षी ८० टक्के राहिलेला केसर आंबा हंगाम यंदा १०० टक्के राहण्याची आशा आहे. साधारणपणे २० ते २५ मार्चपासून दोन-तीन टक्के आंबा काढणीला येईल. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात चांगला प्रमाणात तसेच १५ मे पर्यंत ७० ते ८० टक्के केसर आंबा बाजारपेठेत येईल.
डॉ. भगवानराव कापसे, आंबा व फळबाग तज्ज्ञ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT