Governor of Maharashtra Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Education : ‘कृषी शिक्षण व संशोधन’चा अहवाल महिनाभर आधी

Agriculture university : राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांच्या समन्वय आणि सुसूत्रतेसाठी कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीने आपला अहवाल राज्य सरकारकडे सादर केला आहे.

Team Agrowon

Agriculture Research : महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या कार्याचे पुनर्विलोकन करण्यासाठी गठित केलेल्या समितीला अहवाल देण्यासाठी दिलेली मुदतवाढ कमी करण्यात आली आहे. या समितीला आधी सहा महिन्यांची मुदतवाढ दिली होती. ती आता एक महिन्यांनी कमी केली आहे. ३० सप्टेंबर रोजी या समितीने अहवाल सादर करावा, असे आदेश दिले आहेत.

राज्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली या विद्यापीठांच्या समन्वय आणि सुसूत्रतेसाठी परिषदेची स्थापना केलेली आहे. या परिषदेचे मुख्यालय पुण्यात आहे. कृषिमंत्री या परिषदेचे अध्यक्ष असतात. तत्कालीन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या कार्यकाळात या समितीच्या कार्यपद्धतीत बदल करण्यासाठी तसेच नैसर्गिक व जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी कालसुसंगत बदल करण्यासाठी सूचना करण्यासाठी अभ्यासगट स्थापन केला होता.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. आर. बी. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली नऊ जणांची समिती नेमली. या समितीने ४५ दिवसांत अहवाल द्यावा, असे आदेश २५ एप्रिल रोजी देण्यात आले होते. मात्र, १ जून रोजी राज्य सरकारने शुद्धिपत्र काढून या समितीला अहवाल सादर करण्यास सहा महिन्यांची मुदतवाढ दिली. त्यानुसार हा अहवाल ३१ ऑक्टोंबर रोजी सादर करण्यात येणार होता.

राज्यपालांकडून कृषीचा आढावा

काही दिवसांपूर्वी राज्यपाल रमेश बैस यांनी कृषी क्षेत्राचा आढावा घेतला. त्यात त्यांनी यासंदर्भात चर्चा केली. त्यानंतर हा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे ३१ ऑक्टोबर ऐवजी हा अहवाल ३० सप्टेंबर रोजी राज्य सरकारला सादर करण्यात येईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Export : राज्यातून डाळिंब निर्यातीसाठी २१ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

MahaDBT Portal : ‘महाडीबीटी’वरील अर्जांची नऊ महिन्यांपासून सोडतच नाही

Banana Rate : केळीची कमी दराने खरेदी सुरूच कारवाईसत्र राबविण्याची मागणी

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

SCROLL FOR NEXT