Education  Agrowon
ॲग्रो विशेष

Education Department : पुणे जिल्ह्यात माध्यमिक शाळांचा दर्जा घसरला

Pune ZP School : विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या आधारे जिल्हा परिषदेतर्फे शाळा मूल्यांकन स्तर निश्चित करण्यात आला होता. त्या संदर्भातील यादी प्रसिद्ध करण्यात आली होती.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : जिल्ह्यातील अनुदानित व अंशतः अनुदानितच्या केवळ ६ शाळा ‘ओ’ (अतिउत्कृष्ट) दर्जाच्या आढळून आल्या. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागामार्फत शाळांचे अंतिम शाळा मूल्यांकन व स्तर निश्चितीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावरून जिल्ह्यातील माध्यमिक शाळांचा दर्जा खालावल्याचे स्पष्ट झाले आहे.

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या आधारे जिल्हा परिषदेतर्फे शाळा मूल्यांकन स्तर निश्चित करण्यात आला होता. त्या संदर्भातील यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यावर हरकती मागविण्यात आल्या. त्यानंतर समितीने शाळांची ग्रेडेशनची अंतिम यादी जाहीर केली. त्यातून शाळांची माहिती समोर आली आहे.

‘ओ’ (अतिउत्कृष्ट) व ‘ए’ (उत्कृष्ट) मानांकन प्राप्त एकूण ३४ शाळांना नोव्हेंबरअखेर सन्मानपत्र देण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर सुधारणा आवश्यक असलेल्या शाळांचे गुणांकन वाढविण्यासाठी विशेष कार्यशाळा, मार्गदर्शन सत्र व शाळा भेटीचे नियोजन डिसेंबरपर्यंत घेण्याचा निर्णयही घेण्यात आलेला आहे. त्यानुसार प्रशासकीय पातळीवर नियोजन सुरू करण्यात आले आहे.

हडपसर येथील शाळेला ‘ओ’ ग्रेड

हडपसर येथील साधना विद्यालय व आर. आर. शिंदे ज्युनिअर हायस्कूल, हडपसर येथील तुपे साधना कन्या विद्यालय, शिरूर तालुक्यातील विद्याधाम प्रशाला, कै. रा. गो. पलांडे माध्यमिक आश्रम शाळा, कनिष्ठ महाविद्यालय तसेच संभाजीराजे विद्यालय जातेगाव बु. आणि खेड तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालय या शाळांना ‘ओ’ ग्रेड मिळाला आहे.

पुण्यातील शाळांचे रॅंकिंग :

शाळांची संख्या---श्रेणी

६---ओ

२८---ए

४७---बी प्लस

१११---बी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT