Agriculture Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Purandar Lift Irrigation : प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पुरंदर उपसा योजना ठप्प

Team Agrowon

Malshiras News : पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील पुरंदर उपसा पाणी योजना प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे महिन्यापासून बंद आहे. सध्या पाण्याची अत्यंत गरज असताना मागील लाभार्थी शेतकऱ्यांना पाण्याच्या टंचाईला सामोरे देण्याची वेळ आली आहे. योजनेची देखभाल दुरुस्तीची कामे पाहणारी एजन्सी वारंवार बदलली जात आहे. यामुळे ऐन पाण्याची गरज असताना शेतकऱ्यांना योजनेचे पाणी मिळत नसल्याची पाण्याअभावी पिके जळण्याच्या मार्गावर आहेत.

पुरंदर तालुक्यात भागामध्ये पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगामातील शेवटच्या टप्प्यात असणारी पिके वाचविण्यासाठी व नव्याने रब्बी हंगामातील कांदा पिकांची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना पुरंदर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात यंदा मुबलक पाऊस झाला असला तरी सासवडपासून पूर्वेकडील गावांमध्ये मात्र पावसाने पाठ फिरवली आहे. ही सर्व गावे पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रामध्ये येतात.

यामुळे लाभ क्षेत्रातील या गावांचे योजनेचे पाणी मिळण्यासाठी मागील महिनाभरापासून मागणी आहे. यासाठी योजनेच्या अधिकारी वर्गांना फोन करून विनवणी करत असताना दुरुस्तीचे काम चालू असून दोनच दिवसांमध्ये पाणी सुरू होईल, असे महिन्याभरापासून अधिकारी शेतकऱ्यांना सांगत आहेत, मात्र महिना उलटून ही योजना सुरू होत, नसल्याने शेतकऱ्यांच्यात नाराजी आहे.

पूर्व भागातील माळशिरस, राजुरी, नायगाव आदी परिसरात पाण्याची तीव्र टंचाई आहे. शेतातील पिकांवरच जनावरांना चाऱ्याचादेखील प्रश्न यामुळे निर्माण होऊ लागला. सध्या पाण्याअभावी पिके सुकू लागली आहे. वारंवार विनंती करून ही योजना सुरू होत नाही. दोन दिवसांत योजना सुरू करावी
रामदास वाघळे, शेतकरी, माळशिरस
पुरंदर उपसा योजनेचे नदीवर पंपग्रहाच्या ठिकाणी कचरा काढण्याचे काम चालू असून दोन दिवसांत हे काम संपून योजना नव्याने सुरू होईल व शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे पाण्याची टंचाई असलेल्या भागात प्राधान्याने पाणी दिले जाईल.
उत्तमराव शिंदे, उपविभागीय अभियंता पुरंदर उपसा सिंचन योजना सासवड कार्यालय

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chitale Dairy : जातिवंत पशुपैदाशीचे तंत्रज्ञान पोहोचविणारी चितळे डेअरी

Fertilizer : निसर्ग क्रॉप केअरची युरोपियन तंत्रज्ञानावर आधारित खते

State Agriculture Corporation Land : वित्त विभागाच्या विरोधाला केराची टोपली? शेती महामंडळाची ५.४८ हेक्टर जमीन शिर्डी संस्थानला मोफत

Onion Cultivation : खानदेशात कांदा रोपवाटिका निर्मितीची तयारी वेगात

BJP Candidate List : महायुतीच्या जागा वाटपाच्या रस्सीखेचात भाजपची बाजी; उमेदवारांची पहिली यादी जाहीर

SCROLL FOR NEXT