Fish Market Agrowon
ॲग्रो विशेष

Gultekadi Fish Market: गुलटेकडी येथील प्रस्तावित मासळी बाजार अखेर रद्द

Market Committee Meeting Decision: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी येथील मार्केट यार्डात मासळी बाजार सुरू करण्याचा प्रस्ताव अखेर रद्द करण्यात आला. या निर्णयाची घोषणा गुरुवारी (ता. ८) बाजार समितीच्या बैठकीत करण्यात आली.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी येथील मार्केट यार्डातील मुख्य बाजार आवारामध्ये मासळी बाजार सुरू करण्याचा बहुचर्चित प्रकल्प अखेर रद्द करण्यात आला.गुरुवारी (ता. ४) बाजार समितीच्या कार्यालयात प्रशासन व मासळी व्यापारी यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत मासळी बाजार गुलटेकडीऐवजी आवाराबाहेर उभारण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला.

या निर्णयाचे स्थानिक रहिवासी आणि व्यापाऱ्यांनी स्वागत केले आहे. मात्र संचालक मंडळाने राजकीय आणि व्यापाऱ्यांच्या दबावापोटी हतबल होऊन हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. होलसेल मासळी विक्री व्यापारी संघाने गुलटेकडी येथील बाजार समितीच्या आवारात मासळी बाजार उभारण्याचा प्रस्ताव २०२३ मध्ये बाजार समितीला दिला होता.

समितीने हा ठराव मंजूर केला होता. हा प्रकल्प रद्द करण्यासाठी स्थानिक रहिवासी आणि व्यापाऱ्यांनी मोर्चा काढून विरोध केला होता. त्यानंतर याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. १३ जानेवारी २०२५ रोजी उच्च न्यायालयाने होलसेल मासळी विक्री व्यापारी संघाच्या बाजूने निकाल देऊन बाजार समितीच्या आवारात मासळी बाजार उभारण्याची सूचना केली होती.

त्यानंतर अद्याप कार्यवाही झाली नव्हती. मुख्य बाजार आवारातील घटकांचा तसेच स्थानिक रहिवाशांचा तसेच दि पूना मर्चंट चेंबर, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण व अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनीही यास विरोध केला असल्याने बाजार समितीने याप्रकरणी गुरुवारी (ता. ८) बैठक आयोजित केली होती.

बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, सचिव डॉ. राजाराम धोंडकर, संचालक प्रकाश जगताप, संचालक संतोष नांगरे, सहसचिव जी. सी. जेधे, एम. एन. पठारे, मासळी संघाचे कार्याध्यक्ष संतोष परदेशी, विजय परदेशी, सुनील परदेशी, अंबरनाथ परदेशी, शेखर परदेशी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत बाजार समितीच्या आवारातील मासळी बाजाराचा प्रकल्प रद्द करण्यात येत असल्याचा निर्णय बाजार समितीने घेतला.

मासळी बाजार करू नये या बाबत मी पहिल्यापासून विरोधी भूमिका घेतली. ठरावाच्या विरोधात मत मांडले. मासळी बाजार रद्द करण्याचा निर्णय घेतला हा सर्व नागरिकांच्या एकीचा विजय आहे. बाजार समिती सभापती सहकारी संचालक मंडळ यांनी आमचे ऐकले त्याबद्दल त्यांचे ही आभार.
संतोष नांगरे, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biogas Energy: ‘एलपीजी’वाले गॅसवर; बायोगॅस उभारणाऱ्यांना ‘नो टेन्शन’

Livestock Farming: पशुपालन उद्योजकतेस मिळणार चालना

Middle East Conflict: इराणच्या सर्वोच्च नेत्यांना लक्ष्य करण्याच्या रणनीतीचे विपरीत परिणाम

Agriculture Subsidy: कृषी अवजारे बँक स्थापनेसाठी मिळणार ६० टक्के अनुदान

Sugar Production: देशातील साखर उत्पादनात ८६ टक्के वाटा तीन राज्यांचा

SCROLL FOR NEXT