Turmeric productivity in Hingoli reduced by 25% 
ॲग्रो विशेष

Turmeric : हळद, संत्रा पिकांच्या उत्पादकतेत वाढ निर्माण करावी

वर्गीय पिकाचे तसेच संत्रा या फळ पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मालेगाव तालुक्यातील पांगरी कुटे या गावात ही दोन्ही पिके मुख्य नगदी पिके म्हणून समोर येत आहेत.

Team Agrowon

वर्गीय पिकाचे तसेच संत्रा या फळ पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मालेगाव तालुक्यातील पांगरी कुटे या गावात ही दोन्ही पिके मुख्य नगदी पिके म्हणून समोर येत आहेत. येत्या काळात या पिकांची उत्पादकता वाढ तसेच मूल्यसाखळी निर्माण व्हावी असे मत आत्माच्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे यांनी केले.

हळद व संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादनाचे आधुनिक लागवड तंत्र अवगत करून उत्पादन वृद्धीसाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेअंतर्गत (आत्मा) कृषी विज्ञान केंद्राद्वारे हळद पिकावर तिसरी शेती शाळा पांगरी कुटे येथील प्रगतिशील शेतकरी डॉ. प्रवीण कुटे यांच्या शेतात झाली. या वेळी त्या उद्‍घाटक म्हणून बोलत होत्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘केव्हीके’चे प्रमुख डॉ. रवींद्र काळे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून उद्यानविद्या तज्ज्ञ निवृत्ती पाटील, प्रगतिशील शेतकरी डॉ. हेमंत देशमुख (डोंगरकिन्ही), विलास बोरकर (वडजी), प्रा. दीपक कुटे, सचिन इंगोले, कृषी सहायक अतुल राठोड उपस्थित होते. प्रगतिशील शेतकरी गणेश सुभाषराव कुटे, नंदू कुटे व प्रा. दीपक कुटे यांनी आयोजन केले.

अनिसा महाबळे यांनी शेतकरी उत्पादक गटाचे महत्त्व व कार्यपद्धतीबद्दल माहिती देत उत्पादकता वाढीसोबतच मूल्य साखळी निर्माण करून उत्पन्न वाढवावे असे आवाहन केले. केव्हीकेद्वारे राबविण्यात येत असलेल्या गट शेती उपक्रमाची प्रशंसा करून त्याला जोड म्हणून शेती शाळा उपक्रम यशस्वीपणे राबवीत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

विलास बोरकर यांनी त्यांच्या वडजी या गावाची गट शेतीच्या माध्यमातून सुरू असलेल्या संत्रा पिकाची वाटचाल मांडली. हेमंत देशमुख यांनी पारंपरिक पीक पद्धतीत बदल करून संत्रा व हळदीसारख्या नगदी पिकाकडे लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन केले. प्रा. दीपक कुटे यांनी सूत्रसंचालन केले, आभार सचिन इंगोले यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Procurement: केंद्राकडून राज्यात १२ रुपये ३५ पैशानं कांद्याची खरेदी सुरु, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

Banana Cultivation: केळी लागवडीसाठी दर्जेदार कंदांच्या मागणीत वाढ

Khandesh Tur Lagwad: खानदेशात यंदा तूर लागवड स्थिर राहण्याचे संकेत

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

SCROLL FOR NEXT