ॲग्रो विशेष

Marigold Flower Rate : लाल-पिवळ्या झेंडूचा भाव वधारला

Flower Market Update : नवरात्रोत्सव आणि दसरा झाल्यानंतर आता लगेचच दिवाळीनिमित्त बाजारात मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांची आवक झाली आहे.

Team Agrowon

Dombivli News : नवरात्रोत्सव आणि दसरा झाल्यानंतर आता लगेचच दिवाळीनिमित्त बाजारात मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांची आवक झाली आहे. लाल, पिवळ्या आणि भगव्या रंगांच्या झेंडूच्या फुलांनी बाजारपेठा बहरल्या आहेत.

दिवाळीत झेंडूच्या फुलांना विशेष महत्त्व असल्याने नागरिक झेंडू खरेदी करण्यासाठी बाजार परिसरात मोठी गर्दी करत आहेत. यंदा झेंडूचे चांगले उत्पन्न झाले असून झेंडूच्या फुलांना चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून नागरिकांच्या खिशाला मात्र ऐन दिवाळीत कात्री लागलेली पाहायला मिळत आहे.

डोंबिवली स्थानकाबाहेरील किरकोळ फूल बाजारात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. फुले, हार, तोरण, गजरे, आंब्याचे डहाळ खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली. किरकोळ बाजारात झेंडू ८० ते ९० रुपये प्रतिकिलोने विकला जाता आहे.

फुले, तांदळाच्या लोंब्या, तोरणांनी रस्ते सजले आहेत, तर कार्यालयातून घरी परतणारे चाकरमानी खरेदीत दंग झाल्याचे पाहायला मिळत आहे, तसेच घराच्या सजावटीसाठी तोरण खरेदीसाठी नागरिकांची गर्दी पाहावयास मिळत आहे. एक मीटर तोरण १५० ते २०० रुपयांना मिळत आहे.

दिवाळीत दारावर झेंडूच्या फुलांचे तोरण, माळा बांधण्याची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या वेळी मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांचा वापर केला जातो. त्यामुळे पूजेसह घराला सजावट, वाहनांना, तसेच अन्य महत्त्वाच्या वस्तूंना झेंडूच्या फुलांचे हार घातले जातात. लक्ष्मीपूजनाला झेंडूच्या फुलांना विशेष मागणी असते. गेल्या आठवड्यात ४० ते ६० रुपये भावाने विकल्या जाणाऱ्या झेंडूचे भाव तब्बल दोन ते तीन पट वाढले आहेत.

घरांना पिवळ्या आणि नारंगी झेंडूच्या फुलांचे तोरण लागलेले पाहायला मिळते. अवघं घर फुलांनी सजवले जाते. ग्रामीण भागातील फराळात सहसा चिवड्याचे विविध प्रकार, पारंपरिक रव्याचे लाडू, करंजी, चकल्या, अनारसे व शेव असे विविध चविष्ट पदार्थ बनवले जातात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Survey Issue : पीक नुकसानीचे सर्वेक्षण अद्याप सुरूच; शेतकऱ्यांना फटका

Post Monsoon Rain : मॉन्सूनोत्तर पावसाचा धुमाकूळ

Adulteration Issue : ‘अन्न, औषध’चा भेसळखोरांवर बडगा

Rabi Sowing : रब्बीच्या पेरण्यांची मंदगती

Maize Crop Issue : मक्याला आले मोड; सांगा कशी होईल दिवाळी गोड?

SCROLL FOR NEXT