Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department : पाच कृषी संचालकांच्या जागा होणार रिक्त

Agriculture Department Post : राज्याच्या कृषी आयुक्तालयातील सहा संचालकांपैकी पाच जण यंदा टप्प्याटप्प्याने निवृत्त होणार असल्याने या जागा चालू वर्षात रिक्त होणार आहेत.

Team Agrowon

Pune News : राज्याच्या कृषी आयुक्तालयातील सहा संचालकांपैकी पाच जण यंदा टप्प्याटप्प्याने निवृत्त होणार असल्याने या जागा चालू वर्षात रिक्त होणार आहेत. नव्या नियुक्त्यांबाबत आयुक्तालयात उत्सुकता लागून असली, तरी कामकाजाचा भार हा प्रभारींवर येणार आहे.

कृषी आयुक्तालयात आयुक्तानंतर सर्वांत महत्त्वाचे पद संचालकाचे समजले जाते. सध्या सहा संचालक कार्यरत आहेत. ते आयुक्तांच्या अखत्यारित काम करतात. संचालकांच्या अखत्यारित आयुक्तालयातील सहसंचालक तसेच क्षेत्रीय पातळीवरील कृषी सहसंचालक काम करतात.

चालू वर्षात सहापैकी फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते वगळता इतर पाचही संचालक निवृत्त होत आहेत. विशेष म्हणजे रिक्त होणाऱ्या संचालकपदावर कायमस्वरूपी नियुक्त करण्यासाठी सध्या एक सहसंचालक सेवाज्येष्ठता निकष पूर्ण करीत नाही. त्यामुळे आयुक्तालयाचे कामकाज चालविण्यासाठी प्रभारी संचालक नेमावे लागतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

संचालकपदी नियुक्त होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याने सहसंचालकपदी किमान तीन वर्षे सेवा पूर्ण केलेली असावी, असा मुख्य निकष आहे. काही सहसंचालकांनी आतापर्यंत सेवा कालावधी एक वर्षांचा तर काहींनी केवळ दोन वर्षांचा कालावधी पूर्ण केलेला आहे.

त्यामुळे रिक्त जागांवर सेवाज्येष्ठतेनुसार काही सहसंचालकांना प्रभारी संचालक म्हणून नेमले जाईल. त्यानंतर तीन वर्षांचा कालावधी पूर्ण होताच कायमस्वरूपी नियुक्ती केली जाईल, असे एका संचालकाने स्पष्ट केले.

क्षेत्रीय अधिकाऱ्यांमध्ये तसेच राज्याच्या निविष्ठा उद्योगातील प्रतिनिधींमध्ये सध्या निविष्ठा व गुणनियंत्रण संचालकपदाबाबत कमालीची उत्सुकता आहे. या पदासाठी आयुक्तालयातील विद्यमान सहसंचालक सुनील बोरकर यांचे नाव गेल्या वर्षभरापासून चर्चेत आहे.

विस्तार संचालकपदी नियोजन विभागातील सध्याचे सहसंचालक विनयकुमार आवटे यांच्या नियुक्तीची शक्यता आहे. या विभागाच्या कक्षेत पीकविमा योजना, पीकपेरा नियोजन व महत्त्वाच्या विस्तार योजनांचा समावेश आहे.

‘हे’ संचालक होणार निवृत्त

विकास पाटील (निविष्ठा व गुणनियंत्रण विभाग), दिलीप झेंडे (विस्तार व प्रशिक्षण), दशरथ तांभाळे (आत्मा), सुभाष नागरे (प्रक्रिया व नियोजन), रवींद्र भोसले (मृद्संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Procurement: केंद्राकडून राज्यात १२ रुपये ३५ पैशानं कांद्याची खरेदी सुरु, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

Banana Cultivation: केळी लागवडीसाठी दर्जेदार कंदांच्या मागणीत वाढ

Khandesh Tur Lagwad: खानदेशात यंदा तूर लागवड स्थिर राहण्याचे संकेत

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

SCROLL FOR NEXT