Mahayuti Government Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Mahayuti Cabinet Expansion : महायुतीच्या विस्ताला गती; भाजपसह शिवसेना, राष्ट्रवादीकडून या नेत्यांना मंत्रिपदाची संधी

Cabinet Expansion : राज्याचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून (ता.१६) सुरू होत आहे. याआधी महायुती सरकारच्या विस्ताराला गती आली आहे. आज (ता.१५) नव्या मंत्र्याचा शपथविधी होणार आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यात महायुतीचे सरकार आले असून आता १० व्या दिवशी सरकारचा विस्तार होणार आहे. नव्या मंत्र्यांचा आज (ता.१५) नागपूर येथे शपथविधी होणार आहे. सध्या याची जोरदार तयारी सुरू आहे. तर मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे २१ शिवसेना (शिंदे) १२ आणि राष्ट्रवादीच्या १० आमदारांना संधी मिळणार आहे.

नागपुरमध्ये आज मंत्रिमंडळाच्या विस्तारात तब्बल ३९ मंत्र्याची शपथ होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत भाजपकडून १९, शिवसेना ११ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून ९ आमदारांना मंत्रिपदासाठी फोन गेला आहे. भाजपकडून मंत्रिपदाबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधितांना फोन केला आहे. तर मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी तयार राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

भाजपकडून 'या' नेत्यांना मंत्रि‍पदासाठी फोन

मंत्रिमंडळ विस्तारात भाजपकडून कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता भाजपच्या कार्यकर्त्यांसह अनेक नेत्यांना लागली आहे. यादरम्यान बावनकुळे यांनी, कोकणात नितेश राणे यांच्यावर विश्वास टाकला असून साताऱ्यात गादीला मान देत यंदा शिवेंद्रराजे भोसले यांना संधी दिली आहे.

याचबरोबर चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील यांचा मंत्रिमंडळात पुन्हा समावेश करण्यात आला आहे. तर पंकज भोयर, जयकुमार रावल, गणेश नाईक, जयकुमार गोरे, अतुल सावे, चंद्रशेखर बावनकुळे, अशोक उईके, आकाश फुंडकर या नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात लाडक्या बहिणींना देखील संधी दिली आहे. ज्यात भाजपकडून पंकजा मुंडे, मेघना बोर्डीकर, माधुरी मिसाळ यांच्या नावाचा समावेश आहे.

शिंदे सेनेचे संभाव्य नावं

एकीकडे मंत्रिमंडळ विस्तारात गृहमंत्रीपद आणि इतर खात्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा सुरू आहेत. तर दुसरीकडे त्यांचे ११ आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यामध्ये उदय सांमत, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, दादा भूसे जुने चेहरे आहेत. तर प्रताप सरनाईक, योगश कदम, भरत गोगावले, संजय राठोड, संजय शिरसाट, आशिष जैस्वाल आणि प्रकाश आबिटकर यां नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे.

राष्ट्रवादीचे ९ आमदार होणार मंत्री

१६ डिसेंबर ते २१ डिसेंबरदरम्यान हिवाळी अधिवेशन होणार आहे. त्याआधी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. भाजप, शिवसेनापाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने ९ आमदारांना तयार राहण्याच्या सूचना केल्या आहेत. सध्या आदिती तटकरे, हसन मुश्रीफ, बाबासाहेब पाटील, दत्तमामा भरणे, नरहरी झिरवाळ ही नावे समोर येत आहेत. पण माजी कृषीमंत्री धनंजय मुंडे, आणि छगन भुजबळ यांच्या नावाचा समावेश नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chana MSP Registration: हरभरा नोंदणी १ मार्चपासून; हमीभावाने हरभरा विक्रीसाठी नोंदणी आवश्यक

Unseasonal Rain: अवकाळी अन् गारपिटीचा तडाखा

Urad Bonus: उडदासाठी ६०० रुपये बोनस, मोहरीसाठी भावांतर योजना; मध्य प्रदेश सरकारचा मोठा निर्णय

Chana Import Pressure on Prices: आयात तीनपट वाढली; हरभऱ्याचा भाव हमीभावापेक्षा १५ ते १८ टक्क्यांनी कमी

Sugarcane Crushing Season: पाच जिल्ह्यांतील दोन कारखान्यांचा हंगाम आटोपला, २३ सुरू

SCROLL FOR NEXT