Cotton Market Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Market : खानदेशात ‘सीसीआय’च्या कापूस खरेदी केंद्रांची संख्या कमी

CCI Cotton Buying Centers : खानदेशात भारतीय कापूस महामंडळाची (सीसीआय) कापूस खरेदी रखडत सुरू झाली आहे.

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
CCI Cotton : जळगाव : खानदेशात भारतीय कापूस महामंडळाची (सीसीआय) कापूस खरेदी रखडत सुरू झाली आहे.

कमी मजूर, अधिकाऱ्यांची कमतरता आदी कारणांमुळे काही केंद्र सुरू तर काही बंद, अशी स्थिती आहे. कापूस घरात पडून असून तो विकण्यासाठी पुरेशी केंद्रे नसल्याचे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

खानदेशात मागील महिन्यात सीसीआयने कापूस खरेदी सुरू केली. पहिले खरेदी केंद्र पहूर (ता. जामनेर, जि .जळगाव) येथे सुरू झाले. यानंतर पाचोरा (जि. जळगाव) व जळगाव शहरातील खरेदी केंद्र सुरू झाले. परंतु अन्य खरेदी केंद्रे सुरू नाहीत.

खानदेशात सीसीआयची सुमारे ११ खरेदी केंद्रे निश्‍चित झाली होती. परंतु सहा केंद्रही कापूस खरेदीसाठी सीसीआयने सुरू केलेली नसल्याची स्थिती आहे. शेतकरी कापूस विक्रीसाठी आणत नाही, नोंदणीला कमी प्रतिसाद आहे, असे सीसीआयकडून सांगितले जाते.

कापूस विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्याकडून फक्त सातबारा, आधार कार्ड व बँक पासबुक घेतले जावे, त्यावर कापूस पिकाची नोंद असल्याची सक्ती करू नये, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत. तसेच कापसाचा दर्जा सर्वत्र चांगला आहे.

त्याबाबत कुठलेही निकष, तपासणी करू नये, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. निकष शिथिल केल्याशिवाय कापूस खरेदीला प्रतिसाद मिळू शकत नाही.

खेडा खरेदीत कमी दर
सध्या कापसाला हमीभावापेक्षा कमी दर खेडा किंवा थेट खरेदीत मिळत आहेत. हमीभाव ७०२० रुपये प्रतिक्विंटल, असा कापसाला जाहीर झाला आहे.

या स्थितीत सीसीआय, शासनाने आढावा घेवून खरेदीसंबंधी केंद्रसंख्या वाढवावी व खरेदीस वेग द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सरकीचा भाव तेजीत; कापूस टिकून, सोयाबीनमध्ये चढ उतार, खरबूजाला उठाव तर टोमॅटो आवक टिकून

Orchards Rain Damages: पावसाचा फळबागांचा फटका

khandesh Water Storage: मध्यम, लघु प्रकल्पांत जलसाठा ५० टक्क्यांपर्यंत

Maharashtra Rain Prediction: पूर्व विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज; उद्यापासून राज्यात पावसाचे वातावणर निवळण्याची शक्यता

Unseasonal Rain Crisis: वादळी पावसाचा तिसऱ्यांदा तडाखा

SCROLL FOR NEXT