Pune APMC  Agrowon
ॲग्रो विशेष

Pune APMC : पुणे बाजार समितीच्या सभापतींवरील अविश्‍वास ठराव नामंजूर

APMC News : अविश्‍वास ठरावाला सभापती काळभोर सामोरे गेले नाहीत. समितीत पारदर्शी कारभार होत नाही. सभापती ठरावाला सामोरे जातील अशी अपेक्षा होती.

Team Agrowon

Pune News : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर यांच्याविरोधात दाखल अविश्‍वास ठरावावरील मतदानाच्या दिवशी शनिवारी (ता. ३१) सभापतींसह समर्थक संचालक उपस्थित न राहिल्याने आणि आवश्यक संचालक संख्येअभावी अविश्‍वास ठराव नामंजूर झाला. त्यामुळे आता पुढील सहा महिने त्यांच्याविरोधात अविश्‍वास ठराव आणता येणार नाही. संचालक मंडळातील सदस्यांना विश्‍वासात न घेता सभापती काळभोर कामकाज करत असल्याचा आरोप दहा संचालकांनी केला होता.

उपसभापती सारिका हरगुडे, मनीषा हरपळे, नितीन दांगट, प्रशांत काळभोर, दत्तात्रेय पायगुडे, शशिकांत गायकवाड, लक्ष्मण केसकर, संतोष नांगरे, अनिरुद्ध भोसले, प्रकाश जगताप या दहा संचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सभापतींविरोधात अविश्‍वास ठराव दाखल केला. त्यावर जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी शनिवारी (ता. ३१) बाजार समितीत विशेष सभा बोलावली होती.

सभेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांना प्राधिकृत केले होते. त्यानुसार जगताप यांनी सभा घेतली. अविश्‍वास ठरावावर चर्चा होऊन मतदान झाले. या वेळी सचिव डॉ. राजाराम धोंडकर उपस्थित होते. याबाबत जगताप म्हणाले, ‘अविश्‍वास ठरावावर चर्चा होऊन मतदान झाले.

कायद्यातील तरतुदीनुसार अविश्‍वास ठरावाच्या बाजूने दोन तृतीयांश म्हणजे १२ संचालकांचे मतदान होणे आवश्यक होते. १८ पैकी १० संचालकांनी अविश्‍वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे सभापतींच्या विरोधातील अविश्‍वास ठराव मंजूर होऊ शकला नाही. कायद्यातील तरतुदीनुसार आता पुढील सहा महिने सभापतींविरोधात अविश्‍वास ठराव आणता येत नाही.’

संचालक काळभोर म्हणाले, ‘अविश्‍वास ठरावाला सभापती काळभोर सामोरे गेले नाहीत. समितीत पारदर्शी कारभार होत नाही. सभापती ठरावाला सामोरे जातील अशी अपेक्षा होती. मात्र कारभाराबाबत उत्तरे द्यावी लागली असती, त्यामुळे त्यांनी तोंड लपविले. १८ पैकी १० संचालकांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले. बहुमत लक्षात घेता बाजार समितीत सभापती अल्पमताचे आहेत.’

सभापतींसह समर्थक संचालक परदेश दौऱ्यावर?

आपल्या विरोधातील अविश्‍वास ठरावाच्या बैठकीला सभापतींसह समर्थक संचालक अनुपस्थित होते. हे सर्व संचालक परदेश दौऱ्यावर गेल्याची चर्चा बाजार आवारात होती. तर शनिवारी (ता. ३१) सायंकाळी सभापतींसह काही संचालकांचा परदेशवारीचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर आल्यानंतर चर्चेला उधाण आले होते. मात्र हा व्हिडिओ परदेशातील आहे की स्थानिक रिसॉर्टमधील आहे, याबाबतची विश्‍वासार्ह माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

बाजार समितीत सर्व संचालकांना विश्‍वासात घेऊनच कारभार सुरू आहे. सभेचे विषय मंजूर होताना दहा संचालकांनी संबंधित विषयांच्या बाजूने मतदान केले आहे. त्यामुळे समितीच्या कारभाराबाबत बोलण्याचा अधिकार त्यांना नाही.’
- दिलीप काळभोर, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी नव्हे, कर्जवसुली मोहीम; सरकारच्या शेतकरी धोरणांवर आमदार दानवेंचा जोरदार हल्लाबोल

Maharashtra Monsoon Session 2026: 'शेतकरी हवालदिल, पाणी नाही, रात्री २ वाजेपर्यंत झोप लागत नाही', शेतकरी प्रश्नांवरुन विधानसभेत गदारोळ

Girna Dam Water Release: गिरणा धरणातून टंचाई निवारणासाठी पाचवे आवर्तन

Natural Farming Workshop: केव्हीकेत नैसर्गिक शेतीवरील वैज्ञानिक कार्यशाळेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद

Banana Farmers Support: केळी उत्पादकांना विमा योजनेचाच आधार

SCROLL FOR NEXT