Life | New Year Resolutions 2023  Agrowon
ॲग्रो विशेष

New Year Resolutions : नवीन वर्षाचे संकल्प करताय?

प्रत्येकासाठी वर्षभराच्या आठवणी या वेगवेगळ्या असतात. सर्वांत मौल्यवान असते वेळ आणि वेळ कधीही कुणासाठी थांबत नाही.

Team Agrowon

ज्योती आधाट/तुपे

सरत्या वर्षातला आजचा शेवटचा दिवस! २०२२ मधील हा आजचा शेवटचा लेख. यापुढेही ही लेखमाला चालू राहील. वाचकांनीही भरभरून प्रतिसाद दिला. खूप प्रेरणादायी प्रवास होता हा. सर्वांची खूप खूप कृतज्ञ आहे. प्रत्येकासाठी वर्षभराच्या आठवणी या वेगवेगळ्या असतात. सर्वांत मौल्यवान असते वेळ आणि वेळ कधीही कुणासाठी थांबत नाही.

म्हणून वर्षारंभी केलेले संकल्प पूर्ण करायचे असतील तर वेळेचे व्यवस्थापन गरजेचे आहे. जी -जी महान व्यक्तिमत्त्वे होऊन गेलीत किंवा जी -जी महान कार्ये सध्याच्या काळात करत आहेत. त्यांचे क्षणा क्षणांचे नियोजन असते. म्हणून ही व्यक्तिमत्त्वे महान होतात. वेगळे ध्येय मनाशी बाळगून ते पूर्णही करतात. प्रत्येक वेळी काय करायला हवे, याचे ते आधीच नियोजन करतात आणि ते पूर्ण करण्यासाठी १०० टक्के प्रयत्नही करतात.

येणाऱ्या नववर्षात आपण ही असा संकल्प करूयात की जो आपण पूर्ण ही करू शकू आणि त्यामुळे आपल्याला आनंदही मिळेल. नववर्षापासून मी आनंदी राहणार, असाही संकल्प आपण करू शकतो. गेलेल्या वर्षातील प्रत्येक क्षणाविषयी भरभरून कृतज्ञता मानून नववर्षात आनंदी राहण्यासाठी आपण आपल्या आवडीच्या गोष्टी करण्याचे नियोजन करू शकतो. पहाट भ्रमंती खूप ऊर्जादायी असते. जग शांत असत. निसर्गातील सगळं कसं शांततेत चालू असतं. नववर्षात असंच शांत राहायचाही संकल्प करू शकतो.

नववर्षात मी नियमित योगा, ध्यान करणार. जेव्हा आपण आतून एखादी गोष्ट ठरवतो किंवा मनाला आव्हान देतो, की मला हे पूर्ण करायचंच आहे तेव्हा आपण कारणे सांगत नाहीत. कारण तेव्हा आपण स्वतःच स्वतःला दिलेले ते चॅलेंज असते. नववर्षात मी माझ्या कार्यक्षत्राच्या ठिकाणी वेळेत जाऊन पूर्ण कार्यक्षमतेने, चाकोरीबाहेर जाऊन मन लावून काम करील. खूप मोठी कमिटमेंट असते ही!आपण इतर ठिकाणी वेळेत जातो पण ज्यामुळे आपले स्वतःचे, घरच्यांचे पोट भरतो, तिथे आपण उशिरा जातो आणि सहानुभूतीचे वातावरण निर्माण करतो.

कित्येक जण स्वतःचा वेळ १०० टक्क्यांपेक्षा जास्त आपल्या कार्यासाठी देतात. त्यातून त्यांना नवीन शिकायला मिळतं तसेच आनंदही मिळतो. जर रात्री पाठ टेकल्या टेकल्या झोप लागावी असे वाटत असेल, तर दिवसभर आपले काम प्रामाणिक करूयात. मग बघा डोळे मिटवायचा उशीर लगेच समाधानाची शांत झोप लागते. म्हणून येत्या वर्षात मी माझ्या कामाशी प्रामाणिक राहील हा नवसंकल्प करून तो पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहूया.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT