Ajit Pawar News Agrowon
ॲग्रो विशेष

Ajit Pawar Latest: जीवात जीव असे पर्यंत राष्ट्रवादी सोडून जाणार नाही- अजित पवार

माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून जाणार नाही, असा पुनरुच्चार अजित पवार यांनी बारामती गेला आहे.

Team Agrowon

Baramati News : माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून जाणार नाही, या आपल्या विधानाचा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आज बारामतीत बोलताना पुनरुच्चार केला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. बारामतीच्या विकासासाठी मी कायमस्वरूपी कटिबद्ध आहे, माझ्याबाबत विनाकारण संशय निर्माण करणारे, अफवा पसरवणारे वातावरण तयार केले जात असून माझी जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे, अशा बातम्यांकडे बारामतीकरांनी लक्ष देऊ नये, अजित पवार आणि बारामती हे अतूट समीकरण असून मी कायम बारामतीच्या विकासासाठी वचनबद्ध असेल अशी ग्वाही देखील अजित पवार यांनी आज दिली.

गेल्या काही दिवसात अजित पवार यांच्या विषयी माध्यमातुन आलेल्या बातम्या विषयी बोलताना अजित पवार यांनी या सर्व प्रकरणात आपली बदनामी झाल्याची खंत बोलून दाखवली. नॉट रिचेबल हा प्रकार अवघड आहे असे सांगत अजित पवार यांच्यावर एवढं प्रेम का उतू चाललय हेच समजत नाही, असे ते म्हणाले.

विरोधकांच्या बाबतीत मी सॉफ्ट असतो आणि टीका करीत नाही हा आरोप देखील मला मान्य नाही असे सांगत पवार म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणाला एक सभ्य व सुसंस्कृतपणा असून त्या सभ्यतेची पातळी मी कधीही ओलांडणार नाही, संसदीय आयुधांचा वापर करून विरोधक व सरकारला धारेवर धरण्याचे काम अधिवेशनाच्या काळात मी केले आहे.

मात्र एकमेकांवर खुर्च्या भिरकाविणे, अंगावर धावून जाणे, अयोग्य शब्दांचा वापर करणे, विधिमंडळात कागदे भिरकावणे याला तीव्र विरोध म्हणत असतील तर असा विरोध मला कदापीही मान्य होणार नाही.

आपल्याबद्दल आलेल्या बातम्यां बाबत बोलताना एखाद्याच्या मागे किती हात धुऊन लागावे याला पण काही मर्यादा असतात, त्या मर्यादा पाळल्या गेल्या नाहीत, अशी नाराजीही त्यांनी बोलून दाखविली. काहीही झाले की अजित पवार नॉट रिचेबल आहे, अशा पद्धतीच्या बातम्या माध्यमातून येतात आणि त्याचा विपर्यास केला जातो, मात्र बारामतीकरांना मी सांगू इच्छितो की शेवटच्या क्षणापर्यंत मी बारामतीच्या विकासासाठी कार्यरत असेल.

ज्येष्ठ नेते शरद पवार, सुप्रिया सुळे किंवा मी स्वतः कार्यकर्त्यांच्या जीवावरच मोठे झालेलो आहे, त्यामुळे आमच्या राजकीय प्रवासात कार्यकर्त्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. सर्व पदाधिकाऱ्यांनी देखील कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे, अशी अपेक्षा देखील अजित पवार यांनी व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune ZP: पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वीरधवल जगदाळे

Wheat Harvesting: पुणे विभागात गहू काढणीला वेग

Agriculture Department: तंत्र अधिकारी संवर्गात ठेवणे अन्यायकारक ठरेल

Talathi Bribery Case: लाचखोर तलाठ्याला सात वर्षांची सक्तमजुरी

Fruit Farming Workshop: सीताफळाचे भवितव्य ठरविण्यासाठी पुण्यात कार्यशाळा

SCROLL FOR NEXT