Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Prahar Sanghatana : नुकसान भरपाईसाठी ‘प्रहार’ करणार आंदोलन

Crop Damage : नगर जिल्ह्यात यंदा उन्हाळ्यात जोरदार गारपीट, अवकाळी पाऊस झाला. त्यात शेतपिकांचे मोठे नुकसान झाले.

Team Agrowon

Nagar Crop Damage News : अतिवृष्टी, गारपीट व अन्य नैसर्गिक परिस्थितीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करूनही नुकसान भरपाई मिळत नसल्याने नेवासा तालुक्यातील प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

याबाबत तहसीलदारांना निवेदन दिले आहे. तातडीने अनुदान द्या, अन्यथा २६ मे रोजी नेवाशात आंदोलन करणार असल्याचे निवेदनात स्पष्ट केले आहे.

नगर जिल्ह्यात यंदा उन्हाळ्यात जोरदार गारपीट, अवकाळी पाऊस झाला. त्यात शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. गेल्यावर्षी पावसाळ्याच्या शेवटी जवळपास वीस दिवस सतत पाऊस झाला. त्या पावसाने नुकसान झाले. नुकसान भरपाई मिळावी म्हणून पिकांचे पंचनामे केले मात्र अजूनही अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही.

यावर्षी एप्रिल व मे महिन्यातही मोठ्या प्रमाणात गारपीट व अवकाळी पाऊस झाला. सुमारे २५ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगर जिल्ह्यातील वनकुटे येथे भेट दिली होती. त्यावेळी सात दिवसांत अनुदान जमा करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र आता त्याला सव्वा महिन्याचा कालावधी उलटला तरी अजूनही मदत मिळाली नाही.

नुकसानीचे अनुदान कधी मिळणार याबाबत विचारणा करून अनेक शेतकरी कृषी कार्यालयात चकरा मारत आहेत.

शेतकरी अडचणीत असताना अनुदान दिले जात नसल्याने नेवासा तालुक्यातील प्रहारचे अनिल विधाटे, ॲड. पांडुरंग औताडे, पांडुरंग नवले, सूर्यभान नवले, राजेंद्र कळसकर, उमाजी विधाटे, अशोक विधाटे, आदिनाथ कडू यांच्यासह शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले असून नुकसान भरपाई तातडीने मिळावी अन्यथा २६ मे रोजी नेवासा येथे आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.

अनुदान प्राप्त, अनुदान दिलेले व प्रलंबित शेतकरी यांची यादी जाहीर करावी अशी मागणी निवेदनात केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT