Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage In Nagar : नगर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाहीत

मागील आठवड्यात झालेल्या पाऊस व गारपिटीने नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Team Agrowon

Nagar News : मागील आठवड्यात झालेल्या पाऊस व गारपिटीने (Hailstorm) नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नेवासे तालुक्यासह नगर जिल्ह्यातील एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही.

शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याबाबत कार्यवाही केली जात असून, तशा सूचना दिल्या आहेत, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे व कार्यकर्त्यांना दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनाही त्यांनी निवेदन दिले.

शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष व अखिल भारतीय मराठा महासंघाचे सचिव संभाजी दहातोंडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी बुधवारी (ता. १२) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याबाबत निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे, की मागील आठवड्यात जोरदार वादळी पाऊस व गारपीट नेवासे तालुक्यातील अनेक गावांत झाली आहे. चांदा, कौठा, कुकाणा, लोहरवाडी, तेलकुडगाव, देवसडे आदी ठिकाणी घरे, गोठे, शेतातील पिके, कांदा, डाळिंब, गहू, मका यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

नेवासे तालुक्यातील नुकसानीची काही ठिकाणी धावती पाहणी तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांनी केली आहे.

तत्काळ सर्व परिसर, नेवासे तालुक्यातील व अहमदनगर जिल्ह्यातील इतर नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून सर्व ठिकाणी पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी.

याअगोदर दोनदा अतिवृष्टी नेवासे तालुक्यात झाली होती. पंचनामेदेखील झाले होते; परंतु शासनाकडून कुठलीही मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही, ही वस्तुस्थिती आहे.

नगर जिल्ह्यातील अनेक भागांत अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झाले आहे. कृपया आपण तत्काळ नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्यास आदेश द्यावेत व शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी विनंती करण्यात आली.

मुख्यमंत्री शिंदे यांनी नेवासे तालुक्यासह नगर जिल्ह्यातील एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याबाबत कार्यवाही केली जात असल्याचे सांगत जिल्हा प्रशासनाला याबाबत लगेच सूचना दिल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026: कृषी शिक्षण, संशोधनावरील तरतूद वर्षागणिक तोकडीच

Bharat-VISTAAR AI: अर्थसंकल्पातून 'भारत विस्तार एआय'ची घोषणा, याचा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Sandlwood Cultivation : चंदन लागवडीसाठी अर्थसंकल्पात तरतूद; पाच राज्यांमध्ये चंदनाची सर्वाधिक लागवड

Groundwater Management: सर्व विभागाच्या समन्वयातून भूजल व्यवस्थापनाची गरज

Union Budget 2026: कृषी, ग्रामीण उद्योगासह शेतकरी हिताचा संकल्प

SCROLL FOR NEXT