Jalgaon Apmc Election Agrowon
ॲग्रो विशेष

Jalgaon APMC Election : जळगाव बाजार समितीतील उमेदवारांची नावे नेते जाहीर करेनात

Krishi Utpanna Bajar Samiti Election : जळगाव बाजार समिती निवडणुकांसाठी विविध पक्ष किंवा आघाड्यांनी प्रचार सुरू केला आहे. पण पॅनेलमध्ये नेमके उमेदवार कोण, हे कोडे अपवाद वगळता कुठेही सुटलेले नाही.

Team Agrowon

Jalgaon Election News : जळगाव बाजार समिती निवडणुकांसाठी (Jalgaon Market Committee Election) विविध पक्ष किंवा आघाड्यांनी प्रचार सुरू केला आहे. पण पॅनेलमध्ये नेमके उमेदवार कोण, हे कोडे अपवाद वगळता कुठेही सुटलेले नाही. माघारीनंतरच उमेदवारांची अंतिम यादी येईल, असे दिसत आहे.

आतापासून उमेदवार निश्चित केल्यास पुढे बंडखोरी होईल. त्याचा लाभ विरोधक घेतील, अशी भीती नेत्यांना आहे. नावे आहेत, पण थोडे थांबा, अशी प्रतिक्रिया विविध पक्षाचे नेते देत आहेत.

जळगावात युती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांची सर्वच नावे समोर आलेली नाहीत. अशीच स्थिती धरणगाव, अमळनेर, जामनेर, रावेर, यावल, चोपडा, धुळ्यातील धुळे, शिरपूर, दोंडाईचा (ता. शिंदखेडा), नंदुरबार व शहादा येथेही आहे. नेते मेळावे घेत आहेत.

बैठका घेऊन कार्यकर्त्यांची समजूत घालणे व पुढील रणनीती तयार करीत आहेत. परंतु उमेदवार कोण आहेत, हे स्पष्ट झालेले नाही. मेळाव्यांत सर्वच इच्छुक उमेदवार हजेरी लावत आहेत. पण आपली उमेदवारी अंतिम असेल का, याची खात्री इच्छुक उमेदवारांनादेखील नाही.

यामुळे सर्वच पक्षांमध्ये गोंधळाची स्थिती आहे. जातीय समीकरणांसाठी निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा मुद्दाही जळगाव, धुळे, धरणगाव व नंदुरबारात चर्चेत आहे. विजयी होण्याची क्षमता लक्षात न घेता जातीय समीकरण जुळविण्यासाठी काही उमेदवारांची नावे नेत्यांनी पुढे केल्याने नाराजीदेखील आहे.

आव्हाण्याला युतीच्या पॅनेलमध्ये संधी नाही

आव्हाणे गावातून जळगावात शिंदे गट आणि महाविकास आघाडी समर्थकांनी अर्ज दाखल केले होते. परंतु शिंदे गट किंवा भाजप-सेनेच्या पॅनेलमध्ये उमेदवारीसाठी या गावातील कुण्याही कार्यकर्त्याला संधी मिळाली नसल्याची माहिती मिळाली.

स्वकियांकडून अफवांचा बाजार

जळगाव, अमळनेर व धरणगाव येथे महाविकास आघाडी व युतीमध्ये काही कार्यकर्ते उमेदवारीवरून नाराज आहेत. त्यांच्याबाबत अफवादेखील स्वकियांनी पसरविल्या. उमेदवारी नाकारली, भाऊंनी भेट नाकारली, भाऊंनी फोनच घेतला नाही, अशा अफवा काही स्वकीयच तयार करीत आहेत.

यामुळे पॅनेलमध्ये धुसफूस तयार होत आहे. परिणामी, निवडणुकीत याचा फटका बसू शकतो, असेही जळगावात एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

पालकमंत्र्यांकडे माघारीसाठी चर्चा

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना या निवडणुकीत सक्रिय व्हावे लागले. त्यांचे पुत्र प्रताप हे काही दिवस सक्रिय होते. परंतु उमेदवारीसाठी स्पर्धा व माघारीचा अंतिम दिवस लक्षात घेऊन गुलाबराव सक्रिय झाले. त्यांच्या पाळधी (ता. धरणगाव) येथील फार्म हाऊसवर काही अर्ज दाखल केलेल्या कार्यकर्त्यांना बोलाविण्यात आले.

यातच पालकमंत्र्यांची सूचना येण्यापूर्वीच माजी सभापती कैलास चौधरी यांनी माघार घेतली. तर काही नाराज कार्यकर्त्यांची मात्र गुलाबराव यांनी समजूत काढली. पुढील वेळेस संधी देऊ, असे सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest: रविकांत तुपकरांच्या 'दुष्काळ संघर्ष यात्रे'चा उद्या मलकापुरातून शंखनाद, ४ डिसेंबरला बुलढाण्यात एल्गार महामोर्चा

Drought Mitigation : लोकसहभागातून कामे; दुष्काळावर मात करण्यासाठी गावकऱ्यांची अनोखी मोहीम, जलसंधारणाला मिळाली मोठी गती

Agriculture News : इगतपुरीत भातानंतर जवस, मोहरी लागवडीचा उत्तम पर्याय; कमी पाण्यात शेतकऱ्यांना मिळणार दुहेरी नफा

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेला अजितदादांचं नाव देणार? आदिती तटकरेंची महत्त्वाची माहिती

Sugarcane Price : बळीराजाची मागणी: वाढत्या उत्पादन खर्चामुळे उसाला चार हजार रुपये पहिली उचल जाहीर करा

SCROLL FOR NEXT