Land Agrowon
ॲग्रो विशेष

Alibag Land Acquisition: अलिबाग तालुक्यात प्रकल्‍पासाठी घेतलेल्‍या जमिनी १७ वर्षांपासून पडीक

कोणताही प्रकल्प उभारला नसल्याने सुपीक जमीन नापिक झाल्‍याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

Team Agrowon

Alibag News : शेती व्यवसायासंबंधित प्रकल्प उभारणे, त्यातून रोजगार उपलब्‍ध करण्याचे प्रलोभन दाखवून अलिबाग तालुक्यातील खारेपाट भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी खासगी कंपन्यांनी संपादित केल्‍या.

मात्र त्या ठिकाणी कोणताही प्रकल्प उभारला नसल्याने सुपीक जमीन नापिक झाल्‍याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. आपल्‍याला न्याय मिळावा, यासाठी सोमवारी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

जवळपास दहा खासगी कंपन्यांनी दलालाच्या मदतीने १७ वर्षांपूर्वी मेढेखार, काचळी, पिटकरी, खातवीरा, कातळपाडा, हेमनगर, कुसूंबळे येथील ३७५ शेतकऱ्यांकडून ७५० एकर जमीन कवडीमोल भावाने विकत घेतली.

परंतु आजतागायत विकलेल्या जमिनीवर एकही प्रकल्प उभारण्यात आलेला नाही. अनेक वर्षांपासून ही जमीन पडीक आहे. त्याचा परिणाम समुद्र, खाडीतील खारे पाणी शिरल्‍याने पिकती जमीन नापिक झाली आहे.

जवळपास ९० शेतकऱ्यांना पूर्ण मोबदला न देता जमिनीचा ताबा घेण्यात आला आहे. समाज क्रांती आघाडी संचालित मेढेखार, काळवडखाडी, अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance Claim: पीक विमा क्लेम ११० टक्क्यांवर; नांदेडसाठी ३११ कोटींचा भार

Solapur Development Works Issues: तीनशे कोटींच्या विकासकामांना ‘ब्रेक’

Water Scarcity: गढूळ पाण्यावर ग्रामस्थांचा जीव

Onion Price Crash: कांद्याच्या गोणी बाजारातच सोडून हताश शेतकरी घरी परतले

Fertilizer Black Marketing: खताच्या काळाबाजाराला घालणार लगाम

SCROLL FOR NEXT