Crop Insurance  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : पीकविमा पंचनाम्यांतील खाडाखोडीचा मुद्दा गाजला

कृषी विभाग याबाबत चालढकल करीत असल्याचा मुद्दा जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत उपस्थित झाला. यावर पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना उत्तर मागितले.

Team Agrowon

Akola Crop Insurance News : जिल्ह्यात या खरीप हंगामात (Kharif season) अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. त्याचे पंचनामे करताना पीकविमा कंपनीच्या (Crop Insurance Company) कर्मचाऱ्यांकडून कागदपत्रांत खाडाखोड करण्यात आली.

याबाबत तक्रारी झाल्यानंतर मूर्तिजापूर तालुका वगळता जिल्ह्यात कुठेही कृषी विभागाकडून (Agricultural Department) कारवाईसाठी पोलिस तक्रारी देण्यात आल्या नाहीत.

कृषी विभाग याबाबत चालढकल करीत असल्याचा मुद्दा जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत उपस्थित झाला. यावर पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना उत्तर मागितले.

बुधवारी (ता.१५) दुपारी समितीची सभा झाली. अकोला जिल्ह्यात सातही तालुक्यांत अतिवृष्टीने पिकांचे मोठ नुकसान केले. या नुकसानीचे पीकविमा कंपनीकडून पंचनामे करण्यात आले.

पंचनामे करताना महसूल व कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. मात्र त्यानंतर कंपनीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून पंचनाम्यात खाडाखोड करून पीक नुकसानीचे क्षेत्र कमी दाखविल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली होती.

याबाबत शिवसेना जिल्हा प्रमुख व जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर यांनी कृषी विभागाला सूचना दिल्या होत्या.

पोलिसांकडे तक्रार करण्यात चालढकल

कृषी अधीक्षकांनी सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांना संबंधित खोडाखोड प्रकरणाची तपासणी करून पोलिस तक्रार करण्याबाबतचा आदेश काढला होता.

त्यानंतरही महिनाभरात केवळ मूर्तिजापूर तालुक्यातच यासंदर्भात पोलिस तक्रार करण्यात आल्याची बाब सदस्यांनी सभागृहात उपस्थित केली. पोलिसांत तक्रारी करण्याबाबत चालढकल केली जात असल्याचा आरोप या वेळी दातकर यांनी केला. प्रभारी कृषी अधीक्षक मुरलीधर इंगळे यांना सदस्यांनी याबाबत विचारणा केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lek Ladki Yojana: ‘लेक लाडकी’च्या १२५०० लाभार्थी

Farmer Innovation: शेतकऱ्यांच्या कल्पकतेला शाबासकीची थाप

War Impact on Agri: युद्धामुळे खतांच्या किंमती वाढणार?

Ahilyanagar ZP Budget: अहिल्यानगर झेडपीच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी चार कोटी

Village Mapping: गावाचे मॅपिंग नसल्याने शेतकऱ्यांची वाढली चिंता

SCROLL FOR NEXT