Agriculture News Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Inputs : निविष्ठा थेट शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्याचा उपक्रम कौतुकास्पद

National Pomegranate Research : राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्यावतीने अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या कृषीनिविष्ठा आणि फळरोपांचे मोफत वाटप करण्यात आले.

Team Agrowon

Solapur News : वंचित, उपेक्षित प्रवर्गातील शेतकऱ्यांपर्यंत विविधप्रकारच्या निविष्ठा आणि विविध फळांची रोपे देण्याचा डाळिंब संशोधन केंद्राचा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे, असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार यांनी कारंबा (ता. उत्तर सोलापूर) येथे व्यक्त केले.

राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्यावतीने अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या कृषीनिविष्ठा आणि फळरोपांचे मोफत वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. विश्वकर्मा सोशल फाउंडेशनच्या साह्याने हा उपक्रम घेण्यात आला.

डाळिंब संशोधन केंद्राचे केंद्र संचालक डॉ. राजीव मराठे, प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संग्राम धुमाळ, शास्त्रज्ञ रूपा सौजन्य, नम्रता गिरी, डॉ. राहुल डमाळे, विश्वकर्मा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष विनायक सुतार, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष काशिनाथ कदम, संजय आदाटे, शरीफ सय्यद, सुहास भोसले, अनिल सुतार, अमोल सुतार, दिलीप कांबळे, ज्ञानेश्वर कांबळे, राजू कदम, शिवशंकर नारायणकर आदींसह शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रो विशेष

श्री. पवार म्हणाले, की केंद्र शासन आणि राज्य शासनाकडून सामान्य जनतेसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत, त्यात शेतकऱ्यांसाठी खूप योजना आहेत, अशा उपक्रमातून शेट शेतकऱ्यांपर्यंत पोचण्याचा, त्यांना आधार देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांनीही त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. मराठे म्हणाले, की जिल्ह्यासह स्थानिक भागातील शेतकऱ्यांनी कधीही आमच्याकडे यावे, आम्ही वेगवेगळ्या भागात असे उपक्रम राबवतो, वंचित, उपेक्षित शेतकऱ्यांसाठी आमचे नेहमीच प्राधान्य राहिले आहे, असेही ते म्हणाले. प्रास्ताविक विश्वकर्मा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष विनायक सुतार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास भोसले यांनी केले. बाळासाहेब माने यांनी आभार मानले.

उत्तर सोलापुरातील ८ गावात वाटप

या कार्यक्रमात कारंबा, अकोलेकाटी, गुळवंची, बीबीदारफळ, मार्डी, नान्नज, राळेरास, पडसाळी, कुरुल आणि शावळ या १० गावातील अनुसूचित जाती प्रवर्गातील ५३ शेतकऱ्यांना प्रत्येकी सुमारे १० हजार रुपये किंमतीच्या कृषीनिविष्ठांचे मोफत वाटप करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hawaman Andaj : थंडीमुळे राज्याला हुडहुडी; राज्याच्या बहुतांशी भागातील कमान तापमानात घट कायम

Parbhani Voting Percentage : परभणी जिल्ह्यात सरासरी ७१.४५ टक्के मतदान

Rabi Sowing : रब्बी पेरणीला वेग, हरभऱ्याची लागवड जोरात

Vote Turnout : मतदानाचा टक्का वाढला, आता लक्ष निकालाकडे

Rabi Sowing : जालन्यात रब्बीची निम्मी पेरणी

SCROLL FOR NEXT