Rural Employment Agrowon
ॲग्रो विशेष

Rural Employment : ग्रामरोजगार सेवकाने कुटुंबीयांच्या नावे काढली ‘रोहयो’ची बिले

Agriculture Scheme : ग्रामरोजगार सेवकाने त्यांच्या आई, बहीण, भावजय, भाऊ, चुलत बहीण, चुलत भाऊ, सासू-सासरे, पुतणे अशा सर्वांच्याच नावाने रोजगार हमी योजनेची बिले काढली आहेत.

मुकूंद पिंगळे

Nashik News : आमोदे (ता. नांदगाव) येथील ग्रामरोजगार सेवकाने रोजगार हमी योजनेच्या कामांची स्वतःच्या कुटुंबीयांच्याच नावे लाखो रुपयांची बिले काढल्याची तक्रार संबंधित ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली आहे. त्यामुळे गैरव्यवहारासंबंधी पुढे चौकशी होऊन नेमके काय समोर येते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष आहे.

उपसरपंच भूषण पगार, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पगार, रघुनाथ सोनवणे, मायाबाई दळवी, योगिता पगार यांच्यासह ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेत ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ यांच्याकडे तक्रार केली.

त्यानुसार ग्रामपंचायतीने ‘रोहयो’च्या माध्यमातून हनुमाननगर (धनगरवस्ती) येथे तीन हजार वृक्षांची लागवड केल्याचे भासवीत खोटी बिले सादर केली. प्रत्यक्षात जागेवर ३०० वृक्षांचीच लागवड करण्यात आली.

आदिवासी दफनभूमीत एक हजार वृक्षांची लागवड दाखवत बिले काढली. जागेवर मात्र शंभरच वृक्ष जिवंत आहेत. आदिवासी महिलांनी या कामाचाी मागणी केली होती. मात्र त्यांना काम न देता दुसऱ्यांना काम दिले.

‘मनरेगा’च्या जिल्हास्तरीय यंत्रणेकडून होणार चौकशी

वृक्षारोपणासह खोदाईच्या कामात मोठा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. यात ग्रामरोजगार सेवकाने त्यांच्या आई, बहीण, भावजय, भाऊ, चुलत बहीण, चुलत भाऊ, सासू-सासरे, पुतणे अशा सर्वांच्याच नावाने रोजगार हमी योजनेची बिले काढली आहेत.

या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी तक्रार सदस्यांनी केली आहे. ‘मनरेगा’च्या जिल्हास्तरीय यंत्रणेकडून चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन फडोळ यांनी शिष्टमंडळास दिले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biogas Energy: ‘एलपीजी’वाले गॅसवर; बायोगॅस उभारणाऱ्यांना ‘नो टेन्शन’

Livestock Farming: पशुपालन उद्योजकतेस मिळणार चालना

Middle East Conflict: इराणच्या सर्वोच्च नेत्यांना लक्ष्य करण्याच्या रणनीतीचे विपरीत परिणाम

Agriculture Subsidy: कृषी अवजारे बँक स्थापनेसाठी मिळणार ६० टक्के अनुदान

Sugar Production: देशातील साखर उत्पादनात ८६ टक्के वाटा तीन राज्यांचा

SCROLL FOR NEXT