Mhaisal Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Mhaisal Scheme : सरकारने आमचा अंत पाहू नये, अन्यथा आंदोलन तीव्र करू

MLA Vilas Jagtap : आता सरकारने आमचा अंत पाहू नये, अन्यथा यापुढचे आंदोलन आणखी तीव्र करू, असा इशारा जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी दिला.

Team Agrowon

Sangli News : जत तालुक्यासाठी महत्त्वाची ठरणाऱ्या विस्तारित म्हैसाळ योजनेच्या ६५ गावांची उर्वरित एक हजार कोटींची निविदा तातडीने काढावी. आता सरकारने आमचा अंत पाहू नये, अन्यथा यापुढचे आंदोलन आणखी तीव्र करू, असा इशारा जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी दिला.

विस्तारित योजनेची निविदा काढावी, कार्यालय जत येथे व्हावे या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी (ता. २०) जत तालुक्यात माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीयांनी तालुकाभर चक्काजाम आंदोलन केले. सकाळी नऊपासून आंदोलनाला सुरुवात झाली. या आंदोलनाला ६५ गावांसह तालुक्यात मोठा प्रतिसाद लाभला.

विलासराव जगताप, राष्ट्रवादीचे नेते सुरेशराव शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या वेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. मूळ म्हैसाळ योजनेपासून वंचित असणारी ६५ गावे आणि टेंभू योजनेत चार गावांचा समावेश व्हावा यासाठी जत तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन धुमसत आहे.

जगताप यांच्या नेतृत्वाखाली टप्प्याटप्याने आंदोलनाची धार वाढवण्यात येत आहे. तालुक्यात चक्काजाम करून सरकारचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यात आले. विस्तारित योजनेचे काम जरी सरकारने सुरू केले असले तरी ते ज्या भागात पाणी आले आहे, तिथेच काम सुरू आहे.

वास्तविक दोन हजार कोटींची ही योजना आहे. यातील ९८१ कोटींची निविदा काढून कामाला सुरुवात केली आहे. परंतु मूळ वंचित ६५ गावांची निविदा, निधी आणि कामाला सुरुवात नाही. यामुळे शेतकरी, जनतेत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे आंदोलकांनी या उर्वरित कामाची निविदा काढून तातडीने काम सुरू करावे, अशी मागणी केली.

या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. उमदी येथे पाणी संघर्ष समितीचे कार्यकर्ते, मन्सूर खतीब, दिग्विजय चव्हाण, आकाराम मासाळ, अभिजित चव्हाण यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते. संख येथे बुधवारी (ता. २१) तुकाराम बाबा महाराज यांनी ६५ गावांतील लोकांना एकत्र करत दिवसभर पाणी परिषदेचे आयोजन केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing Planning: दारव्हा तालुक्यात ६९ हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन

Illegal HTBT Cotton Seeds: वर्ध्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा जप्त

El Nino Preparedness Guidance: ‘एल निनो’वर मात करण्यासाठी समन्वयाची गरज : प्रा. डॉ. इंद्र मणी

Agriculture Inputs Shortage: कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून युरिया, डीएपीची कृत्रिम टंचाई

BBF Planter: वेळ, मजुरी आणि खर्चात बचत करणारे बीबीएफ पेरणी यंत्र

SCROLL FOR NEXT