Sugarcane factory Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Factory Maharashtra : समन्वय साधून तातडीने कारखाने सुरू करावेत

Sugarcane Factory should be Started : शासनाने मध्यस्थीची भूमिका घेऊन ऊस उत्पादकांना न्याय द्यावा. दोन दिवसांत साखर कारखाने सुरू करावेत.

Team Agrowon

Kolhapur News : ऊस दराबाबत आंदोलन करणाऱ्या संघटनांनी तसेच साखर कारखान्यांनी, ऊसदराबाबत सुवर्णमध्य साधून दोन दिवसांत तोडगा काढावा, या मध्ये शासनाने मध्यस्थीची भूमिका घेऊन ऊस उत्पादकांना न्याय द्यावा. दोन दिवसांत साखर कारखाने सुरू करावेत.

या कालावधीत साखर कारखाने सुरू न झाल्यास ज्या शेतकऱ्यांना ऊस कारखान्याला पाठवायचा आहे, त्या शेतकऱ्यांना शासनातर्फे पोलिस संरक्षण द्यावे. या वेळी आडवा येईल त्याला, त्यांच्या भाषेत उत्तर दिले जाईल, असा इशारा शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष रामचंद्र डांगे यांनी मंगळवारी (ता. २१) येथे दिला.

शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील ऊस उत्पादक, ऊस तोडणी मजूर, वाहनधारकांच्या वतीने ऊस दरावर तोडगा काढावा, या मागणीसाठी येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. या वेळी डांगे बोलत होते.

डांगे म्हणाले, ‘‘वेगवेगळ्या शेतकरी संघटनांनी मागील गळीत हंगामाचा ४०० रुपये व चालू हंगामाचे ३ हजार ५०० रुपयांचा पहिला हप्ता मिळावा, यासाठी गेली २१ दिवस साखर कारखाने बंद ठेवले आहेत. हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील पाच साखर कारखाने बंद ठेवण्यात आले आहेत. यामुळे उत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे.’’

ऊसदरप्रश्नी आज मुंबईत बैठक

राज्यात सुरू असलेल्या ऊस आंदोलनाबाबत तोडगा काढण्यासाठी आज (ता. २२) मंत्रालयात बैठक होणार आहे. सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता ही बैठक होईल. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी, साखर संघाचे पदाधिकारी, साखर आयुक्त व साखर कारखानदार उपस्थित राहतील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT