Banana Truck Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Export : करमाळ्यातून केळीचा पहिला कंटेनर रशियाला रवाना

First Container Dispatched to Russia : करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या केळीचा २० टनांचा पहिला कंटेनर रशियासाठी रवाना झाला

सुदर्शन सुतार

Solapur News : करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या केळीचा २० टनांचा पहिला कंटेनर रशियासाठी रवाना झाला असून, आखाती देशाबरोबरच अन्य देशांतही केळी निर्यात सुरू झाल्याने जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या अशा पल्लवित झाल्या आहेत.

राज्य कृषी पणन मंडळ व मॅग्नेट प्रकल्प यांच्या पुढाकाराने के. डी. एक्स्पोर्ट कंदर यांच्या वतीने पहिला कंटेनर रशियासाठी रवाना करण्यात आला.

मुंबईच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) येथे राज्याचे सहकार व पणन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, जवाहरलाल नेहरू ट्रस्टचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांच्या हस्ते या पहिल्या कंटेनरला झेंडा दाखविण्यात आला.

या वेळी केळी उत्पादक शेतकरी, निर्यातदार यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी आशियन बँकेचे क्रिशेनसिंह रौतेला, मॅग्नेट प्रकल्पाचे सरव्यवस्थापक व प्रकल्प संचालक विनायक कोकरे, संजय कदम आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver Fourth List: कर्जमाफीची चौथी यादी जाहीर, १ लाख १५ हजार ६९७ पात्र शेतकऱ्यांचा समावेश

Fodder Self Sufficiency: दुष्काळात तोंगलाबादचा ‘चारा स्वयंपूर्णतेचा आदर्श ‘पॅटर्न’

Village Development Committees: स्थापन करा दुष्काळ आकलन, निवारण ग्रामविकास समिती

Farmer Issue: दुष्काळातही शेतकऱ्यांवर अन्याय!

Digital Agriculture Policy: डिजिटल सुसूत्रीकरणाचे स्वागतच!

SCROLL FOR NEXT