Amount in difference of MSP Agrowon
ॲग्रो विशेष

Amount in difference of MSP : हमीभावाच्या फरकातील रक्कम अदा करण्यास वित्त विभागाची मंजूरी

Difference of MSP : कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आधारीत दरापेक्षा शासन घोषित किमान आधारभुत किंमत (हमीभाव) जास्त असल्यास त्यामधील फरकाची रक्कम बिजोत्पादक शेतकऱ्यांना देण्यास वित्त विभागाने मान्यता दिली आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : हमीभावाच्या (किमान आधारभूत किंमत) फरकातील रक्कम शेतकऱ्यांना देण्यास वित्त विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे बिजोत्पादक शेतकऱ्यांना १३३८ लाख रूपये मिळणार आहेत. याबाबत वित्त विभागाने मान्यता दिली आहे. त्याबाबतचा शासन निर्णय कृषि, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने काढला आहे. या निर्णयात, बीज उत्पादक कार्यक्रमात स्थिरता आणण्याच्या दृष्टीने तसेच शेतकऱ्यांचा बीज उत्पादन कार्यक्रमातील सहभाग वाढविण्यासाठी हमीभाव लागू करण्यात आली आहे.

पावसाळ्याच्या सुरूवातीलाच पावसाने फिरवलेली पाठ आणि त्यानंतर आलेल्या दुबार पेरणीमुळे राज्यातील बळीराजा हा संकटात सापडला आहे.

त्याप्रमाणे महाराष्ट्र बीज बियाणे महामंडळ मर्यादित अकोला व राष्ट्रीय बीज निगम पुणे यांच्यामार्फत ही योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहविण्यात येते. सन २०२२-२३ बीज उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना MSP च्या फरकातील रक्कम अदा करण्यासाठी राज्यस्तरीय समितीची बैठक घेण्यात आली होती.

तर २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी २५ कोटी रक्कमेची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित अकोला व राष्ट्रीय बीज निगम पुणे यांच्या कृषी आयुक्तालयामार्फत रुपये १८२७.०३ लाख इतक्या रकमेच्या प्रस्ताव देण्यात आला होता. त्याप्रमाणे वित्त विभागाने १३३८ लाख रूपये वितरीत करण्यास कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना मंजुरी दिली आहे.

शासनाच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने शासन आदेश काढला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain Issue: अवकाळी पावसाच्या शक्यतेने शेतकरी धास्तावले

RTE Admission: राज्यात आरटीई प्रवेशाच्या जागांमध्ये मोठी घट

Rabi Crops: पावणेअठरा लाख हेक्टरवर रब्बीचे क्षेत्र

Sangli Water Crisis: सांगलीमध्ये तीन महिन्यांत पाणीसाठ्यात २८ टक्के घट

Khandesh Fodder Crisis: खानदेशात यंदा चारापिके मुबलक

SCROLL FOR NEXT