Dimbhe Dam Canal Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : ‘डिंभे’च्या उजव्या कालव्याला पाणी सोडल्याने शेतकरी सुखावला

Water Released Update : कुकडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरणातून (हुतात्मा बाबू गेनू जलाशय) उजवा कालव्याला गेल्या आठवड्यापासून पाणी सोडण्यात आले आहे.

Team Agrowon

Pune News : कुकडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरणातून (हुतात्मा बाबू गेनू जलाशय) उजवा कालव्याला गेल्या आठवड्यापासून पाणी सोडण्यात आले आहे. पाण्याचे हे आवर्तन साधारण एक महिना चालणार आहे. याचा आंबेगाव- शिरूर तालुक्यांतील सुमारे ६० गावांतील शेतीपिकांना फायदा होणार असून, याबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

आंबेगाव, शिरूर तालुक्यांतील अनेक गावांत पिण्याच्या पा़ण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न भेडसावू लागला होता. याबाबत शेतकऱ्यांनी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना कालव्याला पाणी सोडण्याबाबत निवेदन दिले होते. सध्या उन्हाचा तडाखा वाढला असून शेतकऱ्यांचा ऊस कारखान्याला जात आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उसाच्या शेतात उन्हाळी नगदी पिके घेतली आहेत. उन्हाळी पिकांना पाण्याची गरज भासत आहे. उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालल्याने काही ठिकाणी शेती पिकांनी माना टाकायला सुरुवात केली होती.

उजव्या कालव्याला नियमित पाणी सोडण्यात येत असल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीत डिंभा धरणाचा मोलाचा वाटा राहिला आहे. दरम्यान, पुण्यात उपमुख्यमंत्री तथा कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सहकारमंत्री वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत डिंभे धरण तसेच घोड व मीना शाखा कालव्यात उन्हाळी आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी बैठकीस भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, कुकडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर, वरिष्ठ अधिकारी दत्ता कोकणे यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते.

पूर्व आंबेगावात उन्हाची तीव्रता वाढल्याने शेतीच्या पाण्याबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला होता. शेतकऱ्यांच्या वतीने सहकार मंत्री वळसे पाटील यांच्याकडे पाणी सोडण्याची मागणी केली होती. उजव्या कालव्याला पाणी सोडल्यामुळे पाणीटंचाईच्या काळात शेतीपिकांना दिलासा मिळणार आहे.
अनिल वाळुंज, माजी अध्यक्ष, खरेदी-विक्री संघ, आंबेगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT