River Lapwing Agrowon
ॲग्रो विशेष

Titvi Bird : नदी टिटवी पक्ष्याचे अस्तित्व धोक्यात

River Lapwing Endangered : नदी टिटवी (रिव्हर लॅपविंग) पक्ष्याचे अस्तित्व मोठ्या नद्या, सरोवरे, बेट, वाळू किंवा छोट्या खाडीच्या भागात पाहायला मिळते.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amravati News : नदी टिटवी (रिव्हर लॅपविंग) पक्ष्याचे अस्तित्व मोठ्या नद्या, सरोवरे, बेट, वाळू किंवा छोट्या खाडीच्या भागात पाहायला मिळते. सध्या भारतीय उपखंडात या प्रजातीची संख्या अतिशय वेगाने कमी होत असून, पुढे ही परिस्थिती आणखी चिंताजनक होण्याचे मत नदी टिटवी या पक्ष्यावर संशोधन करणारे प्रतीक चौधरी यांनी संशोधनाच्या आधारे मांडले आहे.

प्रतीक चौधरी हे गेल्या दोन वर्षांपासून श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचे प्रा. डॉ. गजानन वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील नद्यांमध्ये नदी टिटवी पक्ष्याची सद्यःस्थिती, विस्तार, अधिवास आणि प्रजनन यावर सखोल संशोधन करीत आहेत.

या पक्ष्याला ‘कृष्ण टिटवी’ या नावाने सुद्धा ओळखले जाते. जिल्ह्यात फक्त तापी नदीच्या पात्रात आढळणाऱ्या नदी टिटवीचे अस्तित्व धोक्यात आले असल्याचे या संशोधनातून उघड झाले आहे. या संबंधीचा त्यांचा शोधनिबंध नुकताच इंटरनॅशनल जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. २०२२ ते २०२४ यादरम्यान करण्यात आलेल्या नदी सर्व्हेक्षणात जिल्ह्यातील तापी नदीमध्येच या पक्ष्याचे अस्तित्व आढळले आहे.

श्री. चौधरी यांनी जिल्ह्यातून वाहणाऱ्या वर्धा, पूर्णा, बेंबळा, पेढी, पिली, सिपना, गडगा, खापरा अशा एकूण १३ नद्यांचे सखोल सर्वेक्षण केले असता, मेळघाटातील जंगलाला लागून वाहणाऱ्या केवळ तापी नदीतील पात्रामध्येच या नदी टिटवीचे अस्तित्व नोंदवले आहे. जिल्ह्यात केवळ तापी पात्रातच ३३ पक्षिसंख्या आढळून आली आहे. जिल्ह्यातील इतर तलाव, धरणे, नद्यांमध्ये हा पक्षी आढळून आला नाही.

धोक्यात येण्याची कारणे

तापी खोऱ्यात मोठ्या प्रमाणात होणारा वाळू उपसा, दगड व माती उत्खनन, नदीपात्रातील हंगामी शेती, जलप्रदूषण, मासेमारीचे नायलॉन जाळे व स्फोटकांचा वापर, भटके कुत्रे, कावळे, स्थानिकांद्वारा पक्ष्यांची अंडी गोळा करणे आदींमुळे नदी परिसंस्थेचा एक घटक असणाऱ्या या पक्ष्याची प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Navratri Festival: शक्ती रुपेन संस्थितः

Shaktipeeth Highway Protest: ‘शक्तिपीठ’विरोधात १३ जिल्ह्यांत एल्गार; कोल्हापुरातील बैठकीत निर्धार

State Cooperative Bank Anniversary: राज्य सहकारी बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त बालनाट्याचा उपक्रम

Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वरच्या कारभाऱ्यांचा आज होणार फैसला; मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष

Dimbhe Dam Water Leakage: डिंभे धरणातून होतेय पाण्याची गळ

SCROLL FOR NEXT