Jaggery Market Agrowon
ॲग्रो विशेष

Jaggery Demand : गुळाची मागणी रोडावली

Jaggery Market : संक्रातीनंतर गुळाची मागणी कमी झाल्याचा फटका गूळ दराला बसला आहे. गेल्या महिनाभरात गुळाचे दर क्विंटलला चारशे रुपयांनी कमी झाले आहेत.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Jaggery Rate : संक्रातीनंतर गुळाची मागणी कमी झाल्याचा फटका गूळ दराला बसला आहे. गेल्या महिनाभरात गुळाचे दर क्विंटलला चारशे रुपयांनी कमी झाले आहेत. संक्रातीमध्ये सरासरी ४२०० रुपये क्विंटलपर्यंत गेलेले दर आता ३८०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. गुजरातमधून मागणी घटल्याचाही फटका गुळाला बसला आहे.

विशेष म्हणजे गेल्या महिन्याच्या तुलनेत आवक निम्म्यावर आली आहे. तरीही गुळाला दर नसल्याने गूळ बाजारावर (Gul Market) मंदीचे सावट कायम आहे. यंदा उसाचा हंगाम कमी असल्याने गुळाचे उत्पादन कमी होईल यामुळे दरही चांगले राहतील, असा अंदाज होता.

साधारणतः डिसेंबर, जानेवारीमध्ये ४००० रुपयांपर्यंत सरासरी दर राहिले. शीतगृहासाठी अनेक व्यापाऱ्यांनी गुळाची मागणी नोंदवली यामुळे संक्रातीपर्यंत चार हजारांच्या आसपास क्वचितप्रसंगी ४२०० रुपयांपर्यंत दर टिकून होते.

यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत गुऱ्हाळाची संख्या घटल्याने हंगाम संपेपर्यंत तरी गूळ दर टिकून राहतील असा अंदाज होता. संक्रांतीपर्यंत गुळाचे दर चांगले होते. संक्रांतीनंतर मात्र गुळाच्या दरात हळूहळू घट होत गेली. गुजरातमधून मागणी थांबल्याने व्यापाऱ्यांनी शीतगृहासाठीचीही खरेदी थांबवली.

यामुळे गेल्या पंधरा दिवसांत लागेल तितकाच गूळ व्यापारी खरेदी करत आहेत.
गूळ खरेदीसाठी व्यापाऱ्यांत स्पर्धा नसल्याचे चित्र आहे. याचा प्रतिकूल परिणाम गुळाच्या दर वाढीवर होत आहे. सध्या गुळाची दररोज बारा ते पंधरा हजार रव्यांची आवक होत आहे. सगळी खरेदी जितकी मागणी येईल तितक्या प्रमाणात होत आहे.

शीतगृहासाठी खरेदी डिसेंबरपर्यंत झाल्याने आता बहुतांश व्यापारी शीतगृहासाठी खरेदी करण्यास अनुत्सुक आहेत. शेवटच्या टप्प्यात गुळाच्या दरात (Jaggery Rate) घसरण झाल्याने गूळ उत्पादकांना मात्र धक्का बसल्याचे चित्र आहे.

गूळ बाजारात सध्या मागणी कमी, दरही कमी आणि आवकही कमी आहे. सध्या गूळ हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने मोठ्या प्रमाणात गुळाची आवक केवळ एक महिना राहण्याची शक्यता आहे.

यानंतर गुळाची आवक अत्यल्प होऊ शकते. जिल्ह्यात आता बारमाही गुळाचा ट्रेंड सुरू असल्याने व्यापारीही वर्षभर गूळ मिळेल या अपेक्षेने हंगामातील गूळ मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यास कचरत आहेत. या सर्व बाबींचा परिणाम गुळाच्या दरावर होत असल्याचे गोड बाजारातील सूत्रांनी सांगितले.

सध्या गूळ बाजारात मंदीचे वातावरण आहे दर, आवक, मागणी या सर्व बाबी कमी असल्याने गूळ बाजारात निरुत्साह जाणवत आहे.
- के. बी. पाटील, गूळ विभाग प्रमुख, कोल्हापूर बाजार समिती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT