Tembhu Canal Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : रब्बी हंगामासाठी ‘टेंभू’चे आवर्तन सुरू

Rabi Season : टेंभूच्या आवर्तनाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. तर आवर्तन सुरू झाल्याने लाभ क्षेत्रातील ५५ हजार हेक्टरमधील शेती पिकांना लाभ मिळणार आहे.

Team Agrowon

Sangli News : टेंभू ऊपसा सिंचन योजनेचे रब्बी हंगामासाठीचे बहुप्रतिक्षित आवर्तन सुरू झाल्याने कडेगावसह दुष्काळी खानापूर, आटपाडी, सांगोला आदी तालुक्यातील टेंभूच्या आवर्तनाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. तर आवर्तन सुरू झाल्याने लाभ क्षेत्रातील ५५ हजार हेक्टरमधील शेती पिकांना लाभ मिळणार आहे.

टेंभूचे पाणी तालुक्यातील शिवाजीनगर व हिंगणगाव बुद्रुक तलावात पोहोचले. जिल्ह्यातील कडेगावसह खानापूर, आटपाडी आदी योजनेच्या लाभ क्षेत्रातील दुष्काळी तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून टेंभू सिंचन योजनेचे आवर्तन केव्हा सुरू होणार याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती.

चालू वर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने दुष्काळी तालुक्यात तीव्र पाणीटंचाई भासत असून रब्बी पिके पाण्याअभावी कोमेजून जाऊ लागली आहेत. तर ऊस पिकांसह अन्य बागायत पिकेदेखील धोक्यात आली आहेत. त्यामुळे टेंभू योजनेचे आवर्तन सुरू करावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत होती.

कृष्णा नदीचे पाणी अडवून टप्पा क्र १ अ मध्ये सोडले आहे. टप्पा क्रमांक १ अ मधून हे पाणी ६१ मीटर इतक्या खड्या उंचीवर असलेल्या टप्पा क्र १ ब मध्ये सोडण्यात आले आहे. यासाठी टप्पा क्र १ अ मध्ये १९५० अश्वशक्तीचे एकूण ३३ पंप बसवण्यात आले आहेत. यापैकी चार पंप सध्या सुरू करण्यात आले आहेत.

टप्पा क्रमांक १ ब मधून हे पाणी ८५ मीटर उचलले जाऊन योजनेचे पाणी खंबाळे औध बोगद्यातून जोड कालव्याद्वारे तालुक्यातील शिवाजीनगर तलावात असलेल्या टप्पा क्र २ मध्ये पोहोचले आहे. त्याचबरोबर हिंगणगाव बुद्रुक तलावातही योजनेचे पाणी सोडण्यात आले. या ठिकाणी चार ते पाच दिवस हे पाणी सुरू राहणार आहे. त्यानंतर मुख्य कालव्यातून हे पाणी पुढे थेट माहुली (ता. खानापूर) येथील टप्पा क्र. ३ च्या तलावात जाते. पुढे हे पाणी माहुली पंपगृहापासून पुढे प्रवास करीत खानापूर, आटपाडी आणि सांगोला तालुक्यांना दिले जाणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT