Sugar Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Crushing Season : नांदेड विभागाचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात

Team Agrowon

Nanded News : नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयांतर्गत नांदेड विभागातील गाळप हंगाम अंतिम टप्यात आला आहे. यंदा २९ साखर कारखाने सुरू झाले होते. यापैकी सध्या हिंगोली जिल्ह्यातील टोकाई साखर कारखाना बंद झाला आहे. आजपर्यंत चालू कारखान्यांनी ८१ लाख ३ हजार ३९१ टन उसाचे गाळप केले आहे. तर ७८ लाख २ हजार ३०५ क्विंटल साखरचे उत्पादन केल्याची माहिती साखर सहसंचालक सचिन रावल दिली.

नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) विभागातील नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्यांतून गाळप हंगाम २०२३-२४ साठी ३० कारखान्यांनी ऑनलाइन अर्ज केले होते. यातील आजपर्यंत २९ कारखान्यांना गाळप परवाना मिळाला आहे.

यातील सर्वच २९ कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला होता. यात १९ खासगी, तर १० सहकारी साखर कारखान्यांचा समावेश आहे. मंगळवारअखेर (ता. ६) या कारखान्यांनी ८१ लाख ३ हजार ३९१ टन उसाचे गाळप केले आहे. तर ७८ लाख २ हजार ३०५ क्विंटल साखरचे उत्पादन केल्याची माहिती साखर सहसंचालक सचिन रावल दिली. साखरेचा सरासरी उतारा ९.४२ टक्के आला आहे.

नांदेड विभागात सर्वाधिक ११ साखर कारखाने लातूर जिल्ह्यात सुरू झाले आहेत. यात पाच खासगी, तर सहा सहकारी साखर कारखान्यांचा समावेश आहे. यानंतर परभणी जिल्ह्यात सात कारखाने सुरू झाले आहेत. हे सर्वच कारखाने खासगी आहे नांदेड जिल्ह्यात सहा काखान्यांनी गाळप सुरू केले आहे.

यात पाच खासगी, तर एक सहकारी साखर काखान्याचा समावेश आहे. हिंगोली जिल्ह्यात दोन खासगी, तर तीन सहकारी साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. सध्या हिंगोली जिल्ह्यातील टोकाई सहकारी साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपल्याने हा कारखाना १८ जानेवारी रोजी बंद झाला आहे.

कारखानानिहाय ऊस गाळप- साखर उत्पादन

(गाळप टनात साखर उत्पादन क्विंटलमध्ये)

जिल्हा कारखाने ऊस गाळप साखर उत्पादन

नांदेड ६ १३,९७,९७६ १३,२५,७८०

लातूर ११ ३१,७६,६०९ ३१,८१,९२५

परभणी ७ २४,८१,६१५ २३,२३,९५०

हिंगोली ५ १०,४७,१९२ ०९,७०,६५०

एकूण २९ ८१,०३,३९१ ७८,०२,३०५

विभागाचा सरासरी उतारा : ९.४२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

SCROLL FOR NEXT