G-20 Conference Agrowon
ॲग्रो विशेष

G-20 Conference : जी-२० परिषदेच्या नियोजनाबाबत मुख्य समन्वयकांनी घेतला आढावा

जी-२० परिषद बैठकीच्या अनुषंगाने विविध समित्या नेमण्यात आल्या आहेत.

Team Agrowon

Aurnagabad News : जी-२० आंतरराष्ट्रीय परिषदेच्या (G-20 Council) अनुषंगाने शहरात डब्ल्यू -२० (वीमेन्स २०) परिषद होणार आहे. या परिषदेसाठी अनेक देशाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय (Collector Astik Kumar Pandey) यांच्या अध्यक्षतेखाली आणि वीमेन्स-२० परिषदेच्या मुख्य समन्वयक धरित्री पटनायक यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजनाबाबत आढावा घेण्यात आला.

जी-२० परिषद बैठकीच्या अनुषंगाने विविध समित्या नेमण्यात आल्या आहेत. या समितींच्या माध्यमातून करण्यात आलेल्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी आणि मुख्य समन्वयकांनी आढावा घेतला.

नियोजनाबाबत कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहू नयेत, प्रत्येकांनी आपापल्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाव्यात असे, निर्देश जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी संबंधितांना दिले.

या बैठकीस महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने, स्मार्ट सिटीचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी सौरभ जोशी, उपायुक्त अपर्णा थेटे, उपविभागीय अधिकारी रामेश्‍वर रोडगे, मनपा शहर अभियंता ए. बी. देशमुख, सहायक संचालक श्रीमती सुनीता आसवले-मुंडे व विनायक सईद आदी उपस्थित होते.

पटनायक यांची वेरुळला भेट...

वीमेन्स-२० परिषदेच्या मुख्य समन्वयक धरित्री पटनायक यांनी वेरुळला भेट दिली. या भेटी दरम्यान त्यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या एलोरा अभ्यागत केंद्रास भेट दिली.

या वेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी अभ्यागत केंद्राची सविस्तर माहिती दिली. परिषदेत येणारे शिष्टमंडळ वेरूळ येथे भेट देणार आहे.

या ठिकाणी त्यांना महाराष्ट्राच्या संस्कृतीची आणि औरंगाबाद शहराच्या ऐतिहासिक बाजूची ओळख करून देण्यात येणार आहे. अभ्यागत केंद्रामध्ये असलेल्या सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पाहुण्याच्या जेवणासाठी खास महाराष्ट्रीयन पद्धतीने व्यवस्था करण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT