Export Non Basmati Rice agrowon
ॲग्रो विशेष

Non-Basmati Rice Export : ३० हजार मेट्रिक टन बिगर बासमती तांदूळाच्या निर्यातीला परवानगी

Non-Basmati Rice : केंद्र सरकारने टांझानिया देशाला ३० हजार मेट्रिक टन बिगर बासमती तांदूळ निर्यातीस मंजूरी दिली आहे. 

Aslam Abdul Shanedivan

Pune News : केंद्र सरकारने देशातील तांदळाच्या किंमती आटोक्यात ठेण्यासाठी बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर निर्बंध घातली आहे. पण हा निर्णय घेताना विदेश नितीच्या धोरणानुसार केंद्र सरकारने काही देशांना निर्यात करण्याची सूट दिली होती. याप्रमाणे केंद्र सरकारने टांझानिया, जिबूती आणि गिनी बिसाऊ या देशांना तांदूळ निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. 

देशातील तांदूळ निर्यात बंदीच्या दरम्यान केंद्र सरकारने टांझानियाला ३० हजार मेट्रिक टन बिगर बासमती तांदूळ निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. तसेच केंद्राने जिबूती आणि गिनी बिसाऊ या देशांना देखील ३० हजार मेट्रिक टन तुकडा तांदूळ निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेडच्या मार्फत निर्यात केली जाणार आहे. याबाबत विदेश व्यापार महासंचालनालयाने अधिसूचना काढली आहे.

गतवर्षी देशावर एल निनोचा मोठा प्रभाव दिसला. दुष्काळामुळे देशातील भात उत्पादन घटले. त्यामुळे तांदळाच्या किंमतींवर थेट परिणाम झाल्याचे दिसून आले होते. त्यामुळे केंद्र सरकारने देशातील तांदळाच्या किंमती आटोक्यात ठेवण्यासाठी तांदूळ निर्यात बंदीचा निर्याण घेतला. याप्रमाणे केंद्राने सप्टेंबर २०२२ मध्ये तुकडा तांदूळ आणि २० जुलै २०२३ रोजी बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली. 

दरम्यान केंद्र सरकारने विदेश नितीच्या धोरणानुसार मित्र राष्ट्र आणि गरजू देशांना तांदूळ निर्यात करण्याचा निर्णय घेतला होता. परराष्ट्र मंत्रालयाच्या शिफारशीनंतर या देशांना तांदूळ निर्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

Drip Irrigation Subsidy: ठिबक सिंचनासाठी ५५ टक्के अनुदान, दुसऱ्या टप्प्यात २०६ कोटी निधी मंजूर

Cocopeat Sterilization: कोकोपीटचे निर्जंतुकीकरण करताना...

SCROLL FOR NEXT