Nanded ZP Budget Agrowon
ॲग्रो विशेष

Nanded ZP Budget : नांदेड ‘झेडपी’चा २२ कोटी ३६ लाखांचा अर्थसंकल्प

ZP Annual Revenue : नांदेड जिल्हा परिषदेच्या २०२३-२४ मधील उत्पन्न १९ कोटी १९ लाख एवढे मुळ अंदाजपत्रकात धरण्यात आले होते.

Team Agrowon

Nanded News : नांदेड जिल्हा परिषदेच्या २०२३-२४ मधील उत्पन्न १९ कोटी १९ लाख एवढे मुळ अंदाजपत्रकात धरण्यात आले होते. यापैकी सुधारीत अंदाजपत्रकानुसार २४ कोटी सहा लाख जमा अपेक्षित धरत २०२४-२५ मध्ये जिल्हा परिषदेचा मुळ उत्पन्नाचा २२ कोटी ३६ लाख रुपयांचा अर्थसंकल्प जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल यांनी मंगळवारी (ता. पाच) सादर केला.

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात अर्थसंकल्पीय विशेष सभेचे आयोजन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी दुपारी करण्यात आले होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, प्रकल्प संचालक संजय तुबाकले,

मुख्य व लेखावित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी अभय चौधरी, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, मंजुषा कापसे उपस्थिती होती. महिला बालकल्याण, कृषी विषयक, वनीकरण, पंचायत राज, लहान बंधारे यासह अन्य बाबींवर जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात तरतूद केली असल्याचे त्यांनी सांगितले.

ठळक तरतुदी

माळेगाव यात्रेसाठी ६५ लाख रुपये

अनुसूचित जाती जमाती दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी एक कोटी ५६ लाख रुपये

महिला व बालकल्याण विभागासाठी ९६ लाख रुपये

कृषीविषयक कार्यक्रमसाठी एक कोटी २० लाख रुपये

पशुसंवर्धन विभागासाठी ९६ लाख रुपये

लहान पाटबंधारे विभागासाठी ३२ लाख रुपये

दिव्यांग कल्याणासाठी १ कोटी ११ लाख रुपये

शिक्षण विभागाशी संबंधित जिल्हा परिषदेच्या शाळेत १३० किचन ओटे

आरोग्य विभागासाठी बायो मेडिकल वेस्टमधून होणाऱ्या प्रदूषणाचा अटकाव करण्यासाठी ६२ लाख ५० हजार रुपये

जिल्ह्यातील ग्रामीण भागात श्वानदंश, सर्पदंश यातून होणारे मृत्यू रोखण्यासाठी व त्यांना इंजेक्शन पुरविण्यासाठी २० लाख रुपये.

शाळा डिजिटल करण्यासाठी प्रोजेक्टकर, स्क्रीनसाठी तरतूद

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Supply: जेवढी शेतीसाठी गरज, तेवढेच खत शेतकऱ्यांना मिळणार, कृषी विभागाचा निर्णय

Crop Insurance: शेतकऱ्यांना खरिपासाठी एकूण किती भरपाई आतापर्यंत मंजूर झाली?

Parbhani Kharif Planning: खरिपासाठी ७९ हजार ५२२ क्विंटल बियाण्याची मागणी

DJ Noise Incident: लग्नाच्या वरातीत डीजेचा दणदणाट, १४० कोंबड्यांचा मृत्यू, गुन्हा नोंद

Mango Loss 2026: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू नुकसानीचे पंचनामे सुरू

SCROLL FOR NEXT