Parbhani News : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी परभणी जिल्ह्यातील ४ विधानसभा मतदारसंघांतील १ हजार ६२३ मतदान केंद्रावर बुधवारी (ता. २०) एकूण १५ लाख ५३ हजार ३६९ पैकी ११ लाख ९ हजार ८४५ मतदारांनी (७१.४५ टक्के) मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत होती.
परंतु अनेक मतदान केंद्रावर सहा नंतरही मतदार रांगेत असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होते. त्यामुळे २०१९ मधील निवडणुकीच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी वाढली.
परभणी जिल्ह्यात १५ लाख ५४ हजार ५४७ पैकी ११ लाख ९ हजार ८४५ मतदारांनी मतदान केले. त्यात ५ लाख २६ हजार ७ (६९.८५ टक्के) स्त्री मतदार आणि ५ लाख ८३ हजार ८२४ (७२.९६ टक्के) पुरुष, तर १४ (५० टक्के) इतर मतदार आहेत.
जिंतूर मतदारसंघात १ लाख ५४ हजार ४१८ पुरुष मतदार,१ लाख ३८ हजार २०९ स्त्री मतदार, तसेच ७ इतर मतदारांनी मतदान केले. परभणी मतदारसंघात १ लाख २० हजार १७४ पुरुष मतदार, १ लाख १० हजार २४३ स्त्री मतदार तसेच ७ इतर मतदारांनी मतदान केले.
गंगाखेड मतदासंघात १ लाख ६२ हजार ८६ पुरुष मतदार आणि १ लाख ४५ हजार ५९७ स्त्री मतदारांनी मतदान केले. पाथरी मतदारसंघात १ लाख ४७ हजार १४६ पुरुष आणि १ लाख ३१ हजार ९५८ स्त्री मतदारांनी मतदान केले.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत परभणी जिल्ह्यात सरासरी ६७.८३ टक्के मतदान झाले होते.
हिंगोली जिल्ह्यात सरासरी ७२.२४ टक्के मतदान
हिंगोली जिल्ह्यातील ३ मतदारसंघांतील ८९ लाख ८४ हजार ७६४ पैकी ७ लाख ११ हजार ४२९ (७२.२४ टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. वसमत मतदारसंघात ३ लाख २० हजार ७६५ पैकी २ लाख ४० हजार ७३७ (७५.०५ टक्के), कळमनुरी मतदारसंघात ३ लाख ३० हजार ६८६ पैकी २ लाख ४३ हजार ४९० (७३.६३ टक्के) हिंगोली मतदारसंघात ३लाख ३३ हजार ३१३ पैकी २ लाख २७ हजार २०२ (६८.१६ टक्के) मतदान झाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.