Onion Update Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Market : पारनेला कांद्याची आवक वाढली

Onion Update : पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात बुधवारी (ता. १५) १४ हजार २१६ कांदा गोण्यांची आवक झाली.

Team Agrowon

Nagar News : पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात बुधवारी (ता. १५) १४ हजार २१६ कांदा गोण्यांची आवक झाली. आवक कमी झाल्याने प्रथम क्रमांकाच्या कांद्यास सर्वाधिक २२०० रुपये, तर कमीत कमी गोलटी कांद्यास १००० रुपये क्विंटल बाजारभाव मिळाला.

अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना कांद्यास बाजार मिळत नसल्याने शेतकरी सरकारवर नाराज आहेत. कांद्याचे बाजार वाढत नसल्याने शेतकऱ्यांचा उत्पादनाचा खर्च ही वसूल होत नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी तोट्यात जात आहेत.

निवडणूक काळात सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी हटवली; मात्र निर्यातीवरील कर हटविला नसल्याने कांदा निर्यातीस अडचण येत आहे. परिणामी कांदा दरात वाढ होताना दिसत नाही. गुरुवारी पारनेरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात १४ हजार २१६ कांदा गोण्यांची आवक झाली.

अनेक दिवसांपासून कांद्यास बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर सरकारवर नाराज आहेत. सध्या तालुक्यात पाणीटंचाई आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला, तसेच दुधालाही बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर आहे.

बाजार समितीतील दर

प्रथम क्रमांकाच्या कांद्यास २२०० रुपयांपर्यंत.

दोन नंबरच्या कांद्यास १८०० ते २०००.

तीन नंबरच्या कांद्यास १८०० ते १३०० बाजारभाव मिळाला.

छोट्या व गोलटी कांद्यास १००० ते १२०० रुपये बाजारभाव.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT