Banana Market Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Market : केळीची आवक वाढली

Banana Market Update : कमी दर्जाच्या केळी दरात ५० ते ६० रुपये घट

Team Agrowon

Jalgaon Market : खानदेशात दर्जेदार केळीची आवक वाढत आहे. परंतु दरात मोठी वाढ सध्या नाही. काही भागांत दरात किंचित घटही दिसत आहे. कमी दर्जाच्या केळीचे दर क्विंटलमागे ५० ते ६० रुपयांनी कमी झाल्याची माहिती उत्पादक शेतकरी व व्यापाऱ्यांनी दिली.

देशांतर्गत बाजारात केळीची पाठवणूक खानदेशातून सुरू आहे. रमजानच्या पार्श्‍वभूमीवर केळी दरात मोठी सुधारणा होईल, अशी अपेक्षा होती. परंतु सध्या तशी सुधारणा दिसत नाही. केळीची आवक या महिन्यात बऱ्यापैकी वाढली आहे. थंडीची बाधा न झालेल्या (नॉन चिलिंग) केळीस प्रतिक्विंटल १६०० रुपये दर आहे. किमान दर १००० ते १२००, १३०० रुपये प्रतिक्विंटल आहेत.

पंजाब, दिल्ली येथे पाठवणुकीच्या केळीचे दर १३०० ते १३५० रुपये प्रतिक्विंटल आहेत. तर काश्मीरात पाठवणुकीच्या केळीला प्रतिक्विंटल १६०० रुपये दर आहे. केळीची आवक जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, मुक्ताईनगर, चोपडा, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा व अक्कलकुवा भागात बऱ्यापैकी सुरू झाली आहे. सध्या प्रतिदिन ६० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक होत आहे. ही आवक पुढे वाढणार असून, दर्जेदार केळी काढणीसाठी उपलब्ध होतील.

मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर (Burhanpur) येथेही सध्या प्रतिदिन ६० ते ७० ट्रक केळीची आवक होत आहे. तेथेही कमाल दर १६०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. जळगाव, जामनेर या भागात केळीची आवक कमी झाली आहे.

कारण या भागात मृग बहरातील केळीची लागवड कमी असते. सर्वाधिक आवक रावेर तालुक्यात आहे. या भागात पिलबाग केळीसह मृग बहर केळीत काढणी सुरू आहे. जशी उष्णता वाढेल, तशी आवकही वाढणार आहे.

निर्यातदार दाखल
खानदेशात केळीची निर्यात या महिन्यात हळूहळू वेग घेत आहे. सध्या नंदुरबारातील शहादा भागातून सर्वाधिक सात ते आठ कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळीची निर्यात होत आहे. जळगाव जिल्ह्यातूनही रोज पाच ते सहा कंटेनर केळी आखाती देशांत विविध खरेदीदार कंपन्या पाठवित आहेत.

आंध्र प्रदेशात (Andhra Pradesh) केळीची आवक कमी झाली आहे. तेथे मागील महिन्यात कार्यरत निर्यातदार कंपन्या आता खानदेशात दाखल झाल्या आहेत. तीन कंपन्या जळगाव जिल्ह्यात सध्या केळी निर्यातीचे काम करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Procurement Date Extension : कापूस खरेदीला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांसाठी सीसीआयचा महत्वाचा निर्णय

Sugarcane FRP: ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ४,६०१ कोटी एफआरपी थकीत, ४५ कारखाने रडारवर

Raisin Export: बेदाणा निर्यात ८१ टक्क्यांनी घटली, द्राक्ष उत्पादक संकटात; सरकारची कबुली

Bageshwari Lake: बागेश्वरी तलाव परिसर पर्यटनाचे नवे केंद्र

Maize Procurement: मक्याचे दर घसरले; २५ हजार क्विंटल खरेदीवर ब्रेक

SCROLL FOR NEXT