Milk Rate Protest
Milk Rate Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Rate Protest : दूध दर वाढीसाठीच्या आंदोलनांची धग कायम

मुकूंद पिंगळे

Nashik, Nagar, Beed News : दूध भुकटी आयातीच्या निर्णयामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. शुक्रवारी (ता. २८) अनेक भागांत आंदोलने झाली. त्यानंतर शनिवारी (ता. २९) सलग दुसऱ्या दिवशी नाशिक, नगर, बीडसह विविध ठिकाणी आंदोलनाची धग कायम राहिली. या वेळी दुधाला ४० रुपये प्रतिलिटर दर द्यावा, अशी आग्रही मागणी आंदोलकांनी केली.

दुधाला ५ रूपये अनुदान देण्याबाबत घोषणा झाली. मात्र या मुद्द्यावर शनिवारी नाशिक जिल्ह्यात दूध उत्पादक आक्रमक झाले. दूध उत्पादकांनी थेट नाशिक शहरात गायी घेऊन येत आंदोलन केले. आमच्या दुधाला ४० रुपये प्रति लिटर दर द्या व दुधाचा ४० रुपये भाव फिक्स करा, अशी मागणी त्यांनी केली. राज्यात दूध उत्पादकांना न्याय मिळत नसल्याची भावना शेतकऱ्यांनी या आंदोलनातून मांडली. इतर राज्यांच्या तुलनेत राज्यात १० ते १२ कमी दर प्रतिलिटरमागे कमी आहे.

सध्या २२ ते २७ रुपये लिटर इतका दर मिळत आहे. शासनाने जाहीर केलेला प्रतिलिटर ३४ रुपये दर हा परिपत्रकावरच राहिला आहे. त्यापेक्षा मोठ दुर्दैव म्हणजे शासनाने १० हजार टन आयातीला परवानगी देत आयातशुल्क हटविले आहे. त्यामुळे हे दर आणखी कमी होणार असल्याचा संताप आंदोलकांनी व्यक्त केला. दूध उत्पादकांनी गारपोट घारपुरे घाट रस्त्यापासून डुबत्या गाई आणत आंदोलन केले.

अखेर पोलिसांनी आंदोलकांना अडवले. दूध उत्पादकांनी परिसर दणाणून सोडला. सरकारने हा शेतकरी विरोधी निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, दूध उत्पादक शेतकरी किरण सानप यांसह भगवान नागरे, योगेश भराडे, सागर सावंत यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

राहुरीत मंगळवारी ‘स्वाभिमानी’चा रास्ता रोको

गाईच्या दुधाला प्रति लिटर ४० रुपये दर द्यावा, यासह इतर मागण्यांसाठी मंगळवारी (ता. १) राहुरी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. धर्मवीर प्रतिष्ठाणचे अध्यक्ष राजू शेटे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी मोरे यांनी ही माहिती दिली. नगरसह राज्यात दूध दराचा प्रश्न वरचेवर गंभीर होत आहे.

अनेक भागात गाईच्या दुधाला २६ रुपयांपर्यंत दर खाली आले आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे मेटाकुटीला आलेल्या दूध उत्पादकांना मोठा आर्थिक तोटा सोसावा लागत आहे. शुक्रवारपासून किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने राज्यात आंदोलन सुरु केले आहे. आता स्वाभिमानी शेतकरी संघटना, शरद पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीही राज्यातील अनेक भागात आंदोलन सुरू केले आहे.

बीडमध्ये धरणे

नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे पीक कर्ज न भरलेल्या शेतकऱ्यांना सरसकट विनाअट पीक कर्जमाफी द्यावी, यासह दूध भुकटी आयात धोरणाला प्रतिबंध घालण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : बहुतांश जिल्ह्यांत पाऊस सरासरी गाठणार

Monsoon Fishing : पावसाळ्यातील मासेमारी बंदी महत्त्वाची...

Agriculture Pest Management : पैसा, वाणी, बहूपाद किडीचे व्यवस्थापन

Turmeric Crop Management : हळद पिकाचे खत, सिंचन व्यवस्थापन

Monsoon Session 2024 : शेती क्षेत्रावरील खर्चात १५ टक्क्यांची कपात

SCROLL FOR NEXT