Ginger Rate  Agrowon
ॲग्रो विशेष

Ginger Research : आले संशोधन केंद्राच्या हालचाली सुरू

Ginger Crop : राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी कन्नड तालुक्यात आले संशोधन केंद्र देण्याची घोषणा केली होती. याआधी खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथे आले संशोधन केंद्राचा प्रस्ताव होता.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : राज्याच्या कृषिमंत्र्यांनी घोषित केलेल्या कन्नडमधील आले संशोधन केंद्रासाठी आवश्यक जागेची पाहणी शास्त्रज्ञांच्या समितीने नुकतीच नरसिंगपूर (ता. कन्नड) येथे नुकतीच केली.

राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी कन्नड तालुक्यात आले संशोधन केंद्र देण्याची घोषणा केली होती. याआधी खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथे आले संशोधन केंद्राचा प्रस्ताव होता. परंतु त्यात पुढे काही झाले नाही. आता पुन्हा एकदा कन्नड तालुक्यात आले संशोधन केंद्र करण्याची मागणी पुढे आली होती.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही कन्नडमध्ये आले संशोधन केंद्र देण्याची मागणी पुढे केली होती. माहितीनुसार, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत शास्त्रज्ञ व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आले संशोधन केंद्रासाठी आवश्यक जागे करताना नरसिंगपूर (कन्नड) येथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. आले संशोधन केंद्रासाठी साधारणतः २३ हेक्टर किंवा ५० एकर जमीन आवश्यक आहे.

याठिकाणी आले पिकावर व त्यावरील कीड रोग याविषयी संशोधन होणे अपेक्षित आहे. गुरुवारी (ता. २६) मोसंबी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. संजय पाटील, हिमायत बाग फळ संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. जी एम वाघमारे, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ. जी. डी. हिंगोले, उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष आघाव, तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाट, गणेश सर्कलवाड, बाबासाहेब दिवेकर यांनी नरसिंगपूर येथे आले संशोधन केंद्रासाठी आवश्यक जागेची पाहणी केली.

या ठिकाणी तालुका सीड फार्मची जमीन मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. कन्नड खुलताबाद गंगापूर वैजापूर सिल्लोड फुलंब्री आदी तालुक्यात मोठ्या प्रमाणात आले पिकाची लागवड केली जाते. याशिवाय जालना जिल्ह्यातील भोकरदनच्या प्रभात परिसरातही आले पीक घेतले जातील.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात संशोधन केंद्र झाल्याने आले पिकातील अनेक प्रश्नांना संशोधनाची सोय उपलब्ध होणार आहे. जागेची पाहणी केलेल्या तज्ज्ञांच्या समितीने आपला अहवाल कृषी विद्यापीठामार्फत कृषी संशोधन व शिक्षण परिषदेकडे त्यांच्याकडून हा अहवाल कृषी आयुक्तालयाकडे जाईल व नंतर तो शासनाला सादर केला जाईल. पुढील आठवड्यात आले संशोधन केंद्र निर्मितीच्या हालचाली अधिक गतिमान होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT