Leopard Terror Agrowon
ॲग्रो विशेष

Leopard Terror : अजिंठा डोंगर परिसरात बिबट्यांची दहशत

Leopard Attack : खानदेशात सातपुडा पर्वतासह दक्षिण, पश्चिम भागातील सातमाळा, अजिंठा डोंगराच्या परिसरात बिबट्याची दहशत कायम आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात सातपुडा पर्वतासह दक्षिण, पश्चिम भागातील सातमाळा, अजिंठा डोंगराच्या परिसरात बिबट्याची दहशत कायम आहे. दरवर्षी या भागात बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांचा बळी जात आहे. वन विभागाकडून हे मृत्यू, बळी रोखणे शक्य होत नसून, प्रशासनाचे अपयश यात दिसत आहे.

सातपुडा पर्वत खानदेशातील जळगाव, धुळे व नंदुरबारमध्ये आहे. जळगावातील मुक्ताईनगर, रावेर, यावल, चोपडा, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील तळोदा, शहादा, अक्कलकुवा व धडगाव हे तालुके सातपुड्याच्या पायथ्याशी आहेत. या क्षेत्रांमधील मोठा भाग सातपुड्यात आहे.

या भागात केळी, ऊस, पपई व अन्य बागायती पिकांची शेती आहे. या भागात बिबट्याची दहशत कायम आहे. तर सातमाळा पर्वत जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, चाळीसगावलगत आहे.

अजिंठा डोंगर जामनेरनजीक आहे. या भागातील शेतकरी वर्गात बारमाही बिबट्याची दहशत असते. कारण दर महिन्यात बिबट्याचा हल्ला, पशुधनाचा मृत्यू, जीवितहानी असे प्रकार घडत असतात.

शिवारातील शेळ्या, मेढ्या या सुरक्षित नाहीत. पशुधनावर रोजच बिबट्याचे हल्ले होत असतात. यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. जळगावातील चाळीसगाव, पाचोरा भागात बिबट्याचे हल्ले व त्यात होणारे मृत्यू यांचे प्रमाण अधिक आहे.

अनेक बळी बिबट्याच्या हल्ल्यात गेले आहेत. परंतु वन विभागाकडून यासंबंधी योग्य ती कार्यवाही झालेली नाही. अनेकदा मागणी करूनही उपाययोजना केल्या जात नाहीत. यामुळेही अडचणी येतात, अशा तक्रारी आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Double Income : भाजपचा स्वभावच शेतकरीविरोधी; अखिलेश यादवांची शेतकरी प्रश्नांवरून टीका

Manoj Jarange Patil: 'मरण आलं तरी चालेल...'; मनोज जरांगे अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघाले

Marathwada Water Project: मराठवाड्याचा पाणीप्रश्न ऐरणीवर

Mushroom Farming Success Story: अथक प्रयत्नांमधून मशरूमला तयार केले मार्केट

Maratha Protest: मुंबईला आंदोलनासाठी एकटाच जाणार : जरांगे

SCROLL FOR NEXT