Canal  Agrowon
ॲग्रो विशेष

Punegaon Canal : पुणेगाव डावा कालव्याच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण

२००४ पासून भुजबळ यांनी येवला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर त्यांनी हजारो कोटी रुपयांची विविध विकास कामे करून पिण्याच्या पाण्याची व सिंचनाची कामे मार्गी लावली आहे.

Team Agrowon

Nashik News : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या प्रयत्नातून येवला तालुका हा दुष्काळमुक्तीकडे वाटचाल करत आहे. त्यांच्या प्रयत्नातून देवसाने मांजरपाडा प्रकल्प साकारला आहे.

या प्रकल्पाचे पाणी पूर्ण क्षमतेने तालुक्यातील डोंगरगावपर्यंत पोहोचविण्यासाठी त्याच्या माध्यमातून दरसवाडी पोहोच कालवा व पुणेगाव डावा कालवाचे मातीकाम, बांधकाम व अस्तरीकरण करण्यासाठी २४३ कोटी २३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.

या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच या कामाला सुरवात होणार आहे.

येवला हा सतत दुष्काळाच्या छायेत असलेला तालुका होता. २००४ पासून भुजबळ यांनी येवला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर त्यांनी हजारो कोटी रुपयांची विविध विकास कामे करून पिण्याच्या पाण्याची व सिंचनाची कामे मार्गी लावली आहे.

त्यांच्या माध्यमातून येवल्यासाठी असलेल्या मांजरपाडा या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पातील दरसवाडी पोहोच कालवा व पुणेगाव डावा कालव्याची वहन क्षमता वाढविण्यासाठी या कालव्याचे मातीकाम, बांधकाम व अस्तरीकरण करण्यासाठी मागणी केली होती. त्यानुसार या कामासाठी निधीस मंजुरी देखील देण्यात आली.

सिंचन क्षमतेत अधिक वाढ होऊन शेतकऱ्यांना फायदा

या कामास मंजुरी मिळाल्यानंतर तातडीने निविदा प्रक्रिया राबवून कामास सुरवात करावी यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु होता.

त्यांनतर आता दरसवाडी पोहोच कालवा कि.मी.० ते ८८ चे मातीकाम बांधकामे व अस्तरीकरणाचे नूतनीकरण करण्यासाठी १४६ कोटी ८३ लाख तर पुणेगाव डावा कालवा कि.मी. ० ते ६३ चे मातीकाम बांधकामे व अस्तरीकरणाचे नूतनीकरण करण्यासाठी ९५ कोटी ५६ लाख रुपये किमतीची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली.

ही निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून आता लवकरच या कामाला सुरवात होणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर येवला तालुक्यातील सिंचन क्षमतेत अधिक वाढ होऊन शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT