Chief Minister Mazi Ladki Bahin Yojana Agrowon
ॲग्रो विशेष

Majhi Ladki Bahin : ‘लाडकी बहीण’ योजनेपासून दहा हजार महिला वंचित

Ladki Bahin Yojana : महिलांनी अर्ज भरल्यानंतर त्यांना अर्ज मंजुरीचा मेसेज आला आहे. मात्र, काहींना त्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा झाल्याचा मेसेजही आला. मात्र ज्या बँकेचा खाते क्रमांक दिला होता.

Team Agrowon

Jalgaon News : राज्य शासनाने मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत जिल्ह्यात अद्यापही सुमारे दहा हजार महिलांना विविध कारणांमुळे वंचित राहावे लागले; तर सुमारे चोवीसशेवर महिलांचे अर्ज कायमस्वरूपी नामंजूर करण्यात आले. अनेक महिलांना पैसे मंजूर होऊनही त्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा न झाल्याने महिला नाराज आहेत.

राज्य शासनाने राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना २८ जून २०२४ ला मंजूर केली. या योजनेमार्फत राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला १ हजार ५०० रूपये असा आर्थिक लाभ ’डीबीटी’द्वारे देण्यात येत आहे.

जिल्ह्यात सप्टेंबर २०२४ अखेर ९ लाख ७४ हजार ९५० महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले होते. जिल्हा महिला व बाल कल्याण विभागाने त्यापैकी ९ लाख ६१ हजार महिलांची अर्ज मंजूर केले. यात विविध कारणांनी १३ हजार ९४२ अर्ज नामंजूर केले आहेत.

मात्र जिल्हा महिला बाल विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार केवळ ९ हजार ९७६ अर्ज ‘प्रोव्हिजनली नामंजूर’ आहेत तर २ हजार ४५१ अर्ज पूर्णत: नामंजूर केले आहेत. ९ लाख ७३ हजार ४२६ महिलांना या योजनेचा लाभ दिला आहे. मंजूर अर्जाच्या ९९ टक्के महिलांना पैसे दिल्याचा दावा केला जात असला तरी अनेक महिलांना त्या योजनेच्या पैसे त्यांच्या बँक खात्यावर जमा झालेले नाहीत.

महिलांचे हेलपाटे

महिलांनी अर्ज भरल्यानंतर त्यांना अर्ज मंजुरीचा मेसेज आला आहे. मात्र, काहींना त्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा झाल्याचा मेसेजही आला. मात्र ज्या बँकेचा खाते क्रमांक दिला होता. त्या खात्यावर पैसे जमा झालेलेच नाही. रोज महिला त्याच बँकेत जावून पैसे जमा झाल्याचा मेसेज बँकेच्या अधिकाऱ्यांना दाखवितात.

मात्र पैसे बँकेत आलेले दिसत नाही. अशा अनेक महिलांच्या तक्रारी आहेत. ज्या बँकेचा खाते क्रमांक दिला त्याच बँकेत पैसे जमा होणे अपेक्षित असताना, पैसे जमा झाल्याचा मेसेज आलेला असताना पैसे जमा न होणे हे कोणत्या यंत्रणेचे अपयश आहे. यावर जिल्हा प्रशासनाने मार्ग काढण्याची मागणी आहे.

तांत्रिक अडचणींवर उपाय काढा

या योजनेचा अर्ज मंजूर, पैसे खात्यात जमा झाल्याचा मेसेज येतो, मात्र पैसे जमा झालेले नसतात. याला जबाबदार कोण? महसूल विभाग म्हणतो, अर्ज मंजूर केला आहे. यामुळे पैसे येतील. पैसे जमा झाल्याचा मेसेज येतो. मात्र पैसे जमा झालेले नसतात. काहीतरी तांत्रिक अडचण यात आहे. या अडचणी अनेक महिलांना आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

MIDC Long March : एमआयडीसीविरोधात वर्णे ते सातारा ‘लाँग मार्च’

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

SCROLL FOR NEXT