Agriculture Award  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Award : दहा शेतकरी, दोन कर्मचाऱ्यांचा राज्य कृषी पुरस्काराने सन्मान

Agriculture Department : कृषी क्षेत्रात अग्रेसर असलेल्या कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी देण्यात येणाऱ्या विविध कृषी पुरस्काराचे नुकतेच वितरण झाली.

Team Agrowon

Nagar News : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती, संस्था तसेच अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात येणाऱ्या कृषी पुरस्कारांचे नुकतेच वितरण झाले. नगर जिल्ह्यातील दहा शेतकऱ्यांसह कृषी विभागातील दोन कर्मचाऱ्यांचा या पुरस्काराने गौरव झाला आहे.

कृषी क्षेत्रात अग्रेसर असलेल्या कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी देण्यात येणाऱ्या विविध कृषी पुरस्काराचे नुकतेच वितरण झाली. कोविड तसेच विविध कारणांमुळे प्रलंबित असलेले राज्यातील सन २०२०, २०२१ व २०२२ या तीन वर्षांतील एकूण ४४८ पुरस्कार्थी शेतकऱ्यांचा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे, यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान झाला.

त्यात नगर जिल्ह्यातील सुमारे बारा लोकांचा गौरव झाला आहे. त्यात सयाजीराव पोखरकर (कोतुळ ता. अकोले) वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्काराने, पुष्पा अर्जुन नवले (भेंडे खुर्द ता. नेवासा) यांचा जिजामाता कृषिभूषण, मोहन तुंवर (पाचेगाव ता. नेवासा) यांचा सेंद्रीय शेती कृषिभूषण, तुकाराम गुंजाळ (निमज ता. संगमनेर) यांचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, डॉ. शशिकांत शिंदे (भोसे ता. पाथर्डी) यांचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ, प्रशांत नाईकवाडी (संगमनेर),

शिवाजी गाडगे (राहुरी) यांचा शेतीमित्र, शांताराम बारामते (धामनगाव (ता. अकोले) यांचा शेतीनिष्ठ शेतकरी (आदिवासी), बाळासाहेब कारखिले (राळेगण थेरपाळ ता. पारनेर) यांचा उद्यानपंडित, बाळासाहेब गमे (केलवड ता. राहाता) यांचा शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने तर कर्जतचे उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर तसचे बेलपिंपळगाव (ता. नेवासा) येथील कृषी सहायक नीलेश बिबवे यांचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.

नगर शेजारील दौला वडगाव (ता. आष्टी) येथील राहिवासी आणि नगर जिल्ह्यात कांदा बीजोत्पादन व अन्य बाबीवर भरीव काम करणारे कृषिभूषण बाबासाहेब पिसोरे यांना कृषिरत्न पुरस्काराने गौरविले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT