Lonawala KVK Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Variety : लोणावळा केव्हिकेने दिले दहा वाण

Lonawala KVK : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचे कार्यक्षेत्रातील लोणावळा येथील केंद्राने आजपर्यंत दहा भातपिकावरील विविध रोगप्रतिकारक्षम वाण विकसित केले आहे.

Team Agrowon

Pune News : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचे कार्यक्षेत्रातील लोणावळा येथील केंद्राने आजपर्यंत दहा भातपिकावरील विविध रोगप्रतिकारक्षम वाण विकसित केले आहे.

तसेच भातपिकावरील विविध रोगांच्या नियंत्रणासाठी आतापर्यंत नऊ शिफारशी दिल्या आहेत, अशी माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी दिली.

राहुरी येथील कुलगुरू डॉ. पाटील यांनी लोणावळ्यातील कृषी संशोधन केंद्राला बुधवारी (ता. १०) भेट दिली.

या वेळी मार्गदर्शन करताना डॉ. पाटील बोलत होते. या प्रसंगी कृषी संशोधन केंद्रात होत असलेल्या विविध संशोधन प्रकल्पांचा संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. किरणसिंह रघुवंशी यांनी विविध संशोधन प्रयोग, विस्तार कार्यक्रम या विषयी सादरीकरणाद्वारे आढावा घेतला. या वेळी पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासाळकर हे उपस्थित होते.

डॉ. पाटील म्हणाले की, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या कार्यक्षेत्रात विकसित रोग प्रतिकारक्षम वाणाची लागवड खूप मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे भात पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ झाल्याचे दिसून येते. भातपिकांची उत्पादकता वाढण्यास मदत झालेली आहे. त्याचा अवलंब अनेक शेतकरी करत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer ID : देशातील ९ कोटी २५ लाख शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती

Digital Farming Training: भिवंडीतील शेतकऱ्यांसाठी विशेष डिजिटल शेतीशाळा

Solapur ZP Fund: जि. प., पं. स., सदस्यांना १७१ कोटींची लॉटरी

Kanda Sathwan Rog: कांदा काढणीनंतर रोगांची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

Paddy Procurement Drop: रायगड जिल्ह्यात भात खरेदीत घट

SCROLL FOR NEXT