Kartiki Yatra Agrowon
ॲग्रो विशेष

Kartiki Yatra 2024 : ‘कार्तिकी’साठी मंदिर समिती सज्ज; भाविकांना पुरेशा प्रमाणात सोईसुविधा

Kartiki Ekadashi 2024 : कार्तिकी यात्रा कालावधीत भाविकांना आवश्यक व मुबलक सोईसुविधा मंदिर समितीच्या मार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

Team Agrowon

Pandharpur News : कार्तिकी एकादशी मंगळवारी १२ नोव्हेंबर रोजी आहे. या यात्रेला अंदाजे ८ ते १० लाख वारकरी भाविक येतात. कार्तिकी यात्रा कालावधीत भाविकांना आवश्यक व मुबलक सोईसुविधा मंदिर समितीच्या मार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

त्यामध्ये दर्शनरांगेत बॅरिकेडिंग करून त्यावर ताडपत्री शेड, जादा पत्राशेडची निर्मिती, आपत्कालीन गेट, विश्रांती कक्ष, फॅब्रिकेटेड शौचालये, बसण्याची सुविधा, लाइव्ह दर्शन, कुलर-फॅन, मिनरल वॉटर व चहावाटप करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

पंढरपुरात वारीच्या पार्श्‍वभूमीवर विविध तयारीच्या कामांनी वेग घेतला आहे. भाविकांचे लवकरात लवकर दर्शन होण्यासाठी दर्शनरांगा जलद व द्रुतगतीने चालविण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून, याशिवाय, आपत्कालीन व सुरक्षा व्यवस्थेकामी, सोलापूर महानगरपालिका यांचेकडील रेस्क्यू व्हॅन प्रशिक्षित कर्मचा-यासह,

सिझफायर यंत्रणा, स्कायवॉकवर आपत्कालीन गेट व फोनची व्यवस्था, चंद्रभागा नदीपात्रात आपत्ती व्यवस्थापन पथकाची नियुक्ती, अत्याधुनिक ११८ सीसीटीव्ही कॅमेरे व त्यासाठी कंट्रोल रूम, वायरलेस यंत्रणा, जनरेटर, मेटल डिटेक्टर, सार्वजनिक प्रसारण सूचना प्रणाली, चौकशी कक्ष, बँग स्कॅनर मशिन, अपघात विमा पॉलिसी, मॅन काउंटिंग मशिन इ. व्यवस्था करण्यात आली आहे.

वैद्यकीय व्यवस्थेच्या दृष्टीने मंदिर परिसरामध्ये दोन अद्ययावत रुग्णवाहिका वैद्यकीय पथकासह, मंदिर समिती मार्फत श्री संत ज्ञानेश्‍वर दर्शन मंडप येथे प्रथमोपचार केंद्र, वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्ट, मुंबई यांच्यामार्फत भाविकांसाठी मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महिला भाविकांच्या सोईसाठी सॅनिटरी नॅपकिन, हिरकणी कक्ष व चंद्रभागा वाळवंट येथे चेंजिंग रूम उभारण्यात येत आहेत, चेंजिंग रूम चे ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने महिला कमांडोची नियुक्ती करण्यात येत आहे.

दर्शनरांगेत खिचडी, चहा श्रींचा प्रसाद म्हणून बुंदी व राजगिरा लाडूप्रसाद व त्यासाठी पश्चिमद्वार, उत्तरद्वार व्यतिरिक्त श्री संत तुकाराम भवन येथे नवीन स्टॉलची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच दर्शनरांगेत साबुदाणा / तांदळाची खिचडी व चहा तसेच मागील वर्षाप्रमाणे ४ दिवस पत्राशेड येथे २४ तास मोफत भोजन व्यवस्था करण्यात येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Return : मॉन्सूनची महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून माघार

Seasonal Paisewari: छत्रपती संभाजीनगर, जालन्याची हंगामी पैसेवारी ५० पैशांच्या आत

Beed Water Planning: बीडमध्ये पुढील दहा महिन्यांच्या पाणी, चाऱ्याचे नियोजन करा : जी. श्रीकांत

Rabi Crop Variety Selection: रब्बी पिकांसाठी वाण निवड महत्त्वाची

CJP Protest: जेलमध्ये टाकले, तरी आम्ही पुन्हा येऊ : दिपके

SCROLL FOR NEXT