Girna River  Agrowon
ॲग्रो विशेष

Girna River : तांत्रिकदृष्ट्या निमखेडीनजीक गिरणेवर बंधारा अशक्य

Public Work Department : गिरणा नदीवर बांभोरी- निमखेडीला जोडणाऱ्या जुन्या महामार्गावर प्रस्तावित बंधारा वजा पुलाचा प्रश्‍न चांगलाच चिघळला आहे.

Team Agrowon

Jalgaon News : गिरणा नदीवर बांभोरी- निमखेडीला जोडणाऱ्या जुन्या महामार्गावर प्रस्तावित बंधारा वजा पुलाचा प्रश्‍न चांगलाच चिघळला आहे. या ठिकाणी तांत्रिकदृष्ट्या बंधारा शक्य नसल्याचा अहवाल नाशिक येथील संकल्पचित्र विभागाने दिला. त्यामुळे बंधाऱ्याचे काम वगळण्यात आल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे.

गिरणा नदीवर जुन्या महामार्गावर निमखेडी व बांभोरीला जोडणारा जुना पूल होता. त्याच ठिकाणी बंधारावजा पूल करण्यासंबंधी जुलै २०२२ मध्ये शासन निर्णय होऊन ४० कोटींच्या निधीला मान्यता देण्यात आली होती. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने बंधारा वगळून पूल बांधण्यासाठी निविदा मागविल्या.

त्या स्वीकृत करून कार्यादेश देण्याची प्रक्रियाही सुरू केली. मात्र त्याला सर्व स्तरांतून विरोध होत असून, ‘सकाळ’ने सोमवारच्या अंकात या बाबत वृत्त ठळकपणे प्रसिद्ध केल्यानंतर त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. पुलासोबतच बंधाऱ्याचेही काम व्हावे म्हणून त्यासाठी पूल वजा बंधारा निर्मिती कृती समिती स्थापन झाली आहे.

समिती सदस्यांनी बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांचे प्रतिनिधी उपअभियंता गिरीश सूर्यवंशी व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन या कामाबाबत निवेदन दिले. पूल वजा बंधाऱ्याचे बांधकाम होण्यासाठी प्रशासकीय मंजुरी असताना केवळ पुलाच्या कामाचा घाट घातला जात असल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले.

संकल्पचित्र विभागाने काढली त्रुटी

बंधारा बांधण्यासाठी मंजुरी असतानासुद्धा चारच दिवसांत कार्यकारी अभियंता संकल्पचित्र विभाग, नाशिक यांनी त्यांच्या पत्रानुसार यात त्रुटी काढली. गिरणा नदीचा सध्याचा वेग जास्त आहे. त्यामुळे या ठिकाणी पूल कम बंधारा बांधणे योग्य नाही, असा अभिप्राय त्यांनी अहवालात दिला.

तसेच त्यासंबंधी त्रुटी दूर करून त्याची पूर्तता करण्याचे निर्देश कार्यकारी अभियंता, जळगाव यांना दिले होते. मात्र त्याची कोणतीही पूर्तता न करता प्रशासकीय शासन निर्णयातून बंधाऱ्याला वगळण्यात आले व पुलाच्या कामाला ४० कोटींची मान्यता देऊन कार्यादेशही देण्यात आल्याचे कृती समितीने म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT