Bamboo Plant Agrowon
ॲग्रो विशेष

Bamboo Cultivation : बांबू लागवडीसाठी सांघिक प्रयत्न करावेत

Bamboo Farming : जगभरात प्रदूषणाची समस्या वाढत आहे. वातावरण बदलामुळे पुढील पिढ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.

Team Agrowon

Mumbai News : ‘‘राज्यात अधिकाधिक क्षेत्रावर बांबू लागवड होण्याकरिता विविध विभागांनी समन्वयाने आणि सांघिकरित्या प्रयत्न करावेत. पर्यावरण संवर्धन आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी बांबू लागवड उपयोगी आहे,’’ असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

मंत्रालयात आयोजित पहिल्या बांबू टास्क फोर्सच्या बैठकीत ते बोलत होते. उद्योगमंत्री उदय सामंत, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, अनुपकुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, रोहयो विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव विजय वाघमारे उपस्थित होते.

श्री. शिंदे म्हणाले, ‘‘जगभरात प्रदूषणाची समस्या वाढत आहे. वातावरण बदलामुळे पुढील पिढ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. पर्यावरण रक्षण आणि ऊर्जा संकटाचा मुकाबला करण्यासाठी बांबू लागवड हा महत्त्वाचा पर्याय ठरेल.

बांबूची वाढती मागणी लक्षात घेता शेतकऱ्यांनी बांबू लागवड केल्यास मोठा आर्थिक फायदा मिळू शकेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी बांबू क्लस्टर निर्माण करावे.’’

श्री. पटेल म्हणाले,‘‘राज्यात येत्या ५ वर्षांत १० लाख हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड करण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचे स्वप्न आहे. या स्वप्नपूर्तीसाठी बांबू टास्क फोर्सद्वारे काम सुरू आहे.’’

‘बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याचे धोरण’

‘‘शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याचे आपले धोरण आहे. हे धोरण यशस्वी करण्यासाठी राज्यात बांबू लागवडीचे क्षेत्र वाढविण्यासाठी कृषी, वन, सामाजिक वनीकरण, पर्यावरण यासह सर्व विभागांनी सकारात्मक भावनेतून टीम म्हणून काम करावे,’’ असेही आवाहन श्री. शिंदे यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT