Kolhapur Drought agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Drought : कोल्हापूर जिल्ह्यातील तालुक्यांना दुष्काळग्रस्त म्हणून मिळणार सवलती

Drought Condition : जमीन महसुलात सुट, पीक कर्जाचे पुर्नगठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषीपंपाच्या चालू वीज बिलात ३३.५ टक्के सुट देण्यात आल्या आहेत.

sandeep Shirguppe

Maharashtra Drought : राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या ४० तालुक्यांमध्ये जिल्ह्यातील हातकणंगले व गडहिंग्लज या तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ घोषित करुन त्या संबंधी सवलती लागू करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.

हातकणंगले व गडहिंग्लज या तालुक्यामध्ये शासनाने मंजुरी दिलेल्या सवलती लागू करण्यासाठी तात्काळ आवश्यक उपाययोजना अंमलात आणण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले.

मंजुरी देण्यात आलेल्या सवलती पुढीलप्रमाणे

जमीन महसुलात सुट, पीक कर्जाचे पुर्नगठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषीपंपाच्या चालू वीज बिलात ३३.५ टक्के सुट, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रो.ह.यो. अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथीलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर व टंचाई जाहीर केलेल्या तालुक्यातील गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे या सवलती तात्काळ अंमलात आणण्याचे आदेश देण्यात आले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील अन्य तालुक्यांचे काय?

कोल्हापूर जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यांत ज्या मंडळांमध्ये कमी पाऊस झाला आहे. त्याबाबतीत आवश्यक ते निकष निश्चित केले जातील. तिथे दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करून योग्य सवलती देण्यासाठी मदत व पुनर्वसनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे निर्देशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

दोन निर्देशांकांचा विचार

मदत व पुनर्वसन विभागाने पीक पाणी परिस्थितीच्या आढाव्यात दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भातील परिस्थितीची माहिती दिली. यामध्ये 'दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ मधल्या तरतुदीनुसार 'अनिवार्य निर्देशांक' आणि प्रभावदर्शक निर्देशांक' विचारात घेण्यात आले आहेत.

राज्यात यंदा पावसात एकूण सरासरीच्या १३.४ टक्के घट आली असून रब्बी पेरण्या देखील संथपणे सुरू आहेत. आतापर्यंत केवळ १२ टक्के पेरण्या झाल्या आहेत.

तीन हेक्टर मर्यादित मदत

नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार २ दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टर मर्यादित मदत करण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. जून ते ऑक्टोबर २०२३ या पावसाळ्यात अतिवृष्टी, पुरासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतीचे नुकसान झाले आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार २ हेक्टर मर्यादेऐवजी आता ३ हेक्टर मर्यादेत राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दराने मदत करण्यात येईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT