Dr. Kiran Patil Agrowon
ॲग्रो विशेष

Drought Condition : संभाव्य दुष्काळावर उपाययोजना करा

Dr. Kiran Patil : जिल्ह्यात यंदा सरासरी पर्जन्यमानात घट झालेली असून, संभाव्य दुष्काळ व्यवस्थापनासाठी तातडीने उपाययोजना हाती घेणे आवश्यक आहे. यामध्ये जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्याची सूचना जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केली.

Team Agrowon

Buldhana News : जिल्ह्यात यंदा सरासरी पर्जन्यमानात घट झालेली असून, संभाव्य दुष्काळ व्यवस्थापनासाठी तातडीने उपाययोजना हाती घेणे आवश्यक आहे. यामध्ये जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्याची सूचना जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केली.

उपजिल्हाधिकारी (रोहयो) शरद पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, जिल्हा जल संवर्धन अधिकारी अमोल मुंडे, रेशीम विकास अधिकारी व्ही. बी. ठाकरे, मृद्‍ व जलसंधारण विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, उपवनसंरक्षक यांच्यासह संबंधित विभागप्रमुखांच्या उपस्थितीत त्यांनी बैठक घेतली.

पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समिती बैठकीमध्ये जिल्हा यंत्रणांनी सार्वजनिक कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सार्वजनिक कामांमध्ये वृक्ष लागवड, स्मशानभूमीची कामे, ग्रामपंचायत इमारत बांधकाम, शाळाच्या संरक्षक भिंती बांधकाम, पाणंद रस्ते, जलसंधारण, नाला खोलीकरण, गाळ काढणे

यांसह कृषी विभागांतर्गत कामे हाती घ्यावीत. जलस्रोतातील पाणीसाठा वाढविण्यासाठी गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबविताना शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी संबंधित यंत्रणांनी प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी दिल्या. याशिवाय मनरेगा, मातोश्री पाणंद रस्ते, जलयुक्त शिवार योजना आदी योजनांतर्गत कामांचाही आढावा त्यांनी या वेळी घेतला.

जलयुक्त शिवार योजना २.०, पंतप्रधान कृषी सिंचन योजना, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. पाणंद रस्त्याची कामे हाती घेण्यासाठी संयुक्त समिती स्थापन असून, ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेकडे असलेल्या कामांचा वेळेत आढावा घेत ग्रामपंचायत पातळीवर कुशल आणि अकुशलमध्ये ही कामे करून घेण्याचे ते म्हणाले.

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेतून कामे करताना सूक्ष्म नियोजन करून प्रकल्पातील गाळ काढण्याची प्रक्रिया वेगाने हाती घ्यावी. विविध स्वयंसेवी, सामाजिक संस्थांना सहभागी करून घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. मृदा व जलसंधारण विभागासह कृषी विभागांचे शेततळे, सामूहिक शेततळे आदी जलसंधारणाची कामे तालुकानिहाय करावीत. मुख्यमंत्री शाश्‍वत सिंचन योजनेतून जिल्ह्यात जलसंधारणाची कामे हाती घेण्याच्या सूचना त्यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Family Compensation: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना तातडीने मदत; २५ कोटी मंजूर

Fake Fertilizer Sale: भोकरमध्ये बनावट खत विक्रीचा पर्दाफाश

Heavy Rainfall Impact: वादळाचा वीज महावितरणला झटका

Fertilizer Supply Issue: मंजूर साठ्यापेक्षा ४ हजार ४२८ टन कमी खताचा पुरवठा

Kharif Season Preparation: खरीप हंगामासाठी गावोगावी तयारीला वेग

SCROLL FOR NEXT