Takari Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Takari Scheme : ताकारी योजनेचे पाणी तासगाव तालुक्यात

Rajan Davari : योजनेवर अवलंबून असणाऱ्या संपूर्ण क्षेत्राला पाणी पोहोचल्याशिवाय आवर्तन बंद होणार नाही, अशी खात्री कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी दिली.

Team Agrowon

Sangli News : ताकारी लाभक्षेत्रातील पाणी मागणी विचारात घेऊन पाटबंधारे विभागाने ‘ताकारी’चे यावर्षीचे तिसरे व रब्बी हंगामातील दुसरे आवर्तन २२ जानेवारीला सुरू झाले होते. हे पाणी कडेगाव आणि खानापूर तालुक्यांची तहान भागवून सध्या तासगाव तालुक्यातील लोढे गावाजवळून वाहत आहे. योजनेवर अवलंबून असणाऱ्या संपूर्ण क्षेत्राला पाणी पोहोचल्याशिवाय आवर्तन बंद होणार नाही, अशी खात्री कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी दिली.

ताकारी योजनेचे यावर्षीचे पहिले आवर्तन खरीप हंगामात दिले होते. त्यानंतर रब्बी हंगामातील पहिले व यावर्षीचे दुसरे आवर्तन ५ नोव्हेंबरला सुरू करण्यात आले होते. ते आवर्तन सुरू झाल्यानंतर अनेक वेळा तांत्रिक बिघाड व अवकाळी पावसामुळे योजना बंद ठेवावी लागली होती.

परिणामी ३५ दिवस चालणारे आवर्तन तब्बल ५० दिवस चालवावे लागले होते. त्या आवर्तनासाठी कृष्णा नदीतून एक पॉइंट एक टीएमसी पाणी उचलण्यात आले होते. या माध्यमातून ताकारी योजनेच्या सर्व लाभक्षेत्राला पुरेसे पाणी उपलब्ध झाले होते. मिरज तालुक्यातील सोनीपर्यंत (१४४ कि.मी.) सर्व लाभक्षेत्राला पाणी दिल्यानंतर ते आवर्तन बंद केले होते.

ताकारी योजनेच्या वाट्याचे यावर्षीचे ३.६ टीएमसी पाणी अद्याप उचलणे बाकी आहे. सध्या उन्हाचा कडाका वाढल्याने पाणी मागणी वाढली आहे. शिवाय मुख्य कालव्याच्या अंतराचा मोठा टप्पा पार करताना पाटबंधारेला कसरत करावी लागत आहे. यासाठी टप्पा १ व २ वरील ११ पंपाचे पाणी मुख्य कालव्यात सोडले आहे.

टप्पा ३ व ४ वरील प्रत्येकी केवळ २ पंप सुरू असून त्याद्वारे पाणी सोनहिरा खोऱ्यासह तडसरपर्यंत पोहोचविण्याचे नेहमीचे नियोजन आहे. ताकारी योजना आजतागायत सक्षमपणे कार्यरत असून, या योजनेची आवर्तनेही विहीत वेळेत मिळतात. पाणीपट्टी आकारणी व वसुली नियमितपणे होत आहे. यामुळे वीजबिल थकबाकीचा प्रश्न उद्भवत नाही.

ताकारीचे पूर्ण क्षमतेने सोडण्यात आलेले पाणी मुख्य कालव्यातून १४४ किमीवर (सोनी ता. मिरज) पोहोचवले जाणार आहे. यावरील संपूर्ण सिंचनक्षेत्राला पुरेसे पाणी दिले जाणार आहे. शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरून सहकार्य करावे.
राजन डवरी, कार्यकारी अभियंता, ताकारी योजना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Agriculture Input: बनावट निविष्ठांचे जाळे राज्यांच्या सीमापार

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवरील आंदोलन आणि सप्तपर्णीची अ‍ॅलर्जी

Fake Pesticide Issue: बनावट कीडनाशके : हवी सक्षम यंत्रणा

Tissue Culture Lab Scheme: उती संवर्धन प्रयोगशाळेसाठी अर्जाची संधी

Agriculture Services Reform: कृषी विभागाच्या अकरा सेवांचे डिजिटल सुसूत्रीकरण

SCROLL FOR NEXT