Banana Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Export : आखाती आयातदारांना जुन्नरच्या केळीची गोडी

Junnar Banana Cluster : तालुक्यातील निर्यातक्षम केळी पिकांच्या बागांना आखाती देशातील आयात करणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी भेट दिली. मांजरवाडीसह तालुक्यातील विविध ठिकाणच्या केळी पिकाची सविस्तर माहिती जाणून घेतली.

Team Agrowon

Banana Production : खोडद, ता. जुन्नर, जि.पुणे : तालुक्यातील निर्यातक्षम केळी पिकांच्या बागांना आखाती देशातील आयात करणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी भेट दिली. मांजरवाडीसह तालुक्यातील विविध ठिकाणच्या केळी पिकाची सविस्तर माहिती जाणून घेतली.

डेक्कन व्हॅली एफपीसीच्या वतीने सुनील वामन यांनी या पाहणी दौऱ्याचे सादरीकरण केले. यावेळी हस्ताई कोल्ड स्टोअरेजचे गणेश वाघ, शेतकरी कैलास कुटे, मांजरवाडी येथील शेतकरी मुरलीधर थोरात यांच्या शेतावर शेतकरी मेळावा आयोजित केला होता. यावेळी आखाती देशातील ताबासोम राहे पायतख्त कंपनीचे आखाती देशातील प्रतिनिधी ताबासोम हेमती, मरियम अहमदी, युशा सय्यद, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माऊली खंडागळे, डेक्कन व्हॅली एफपीसीचे संचालक अजय बेल्हेकर, रवींद्र थोरात, विनायक मुळे, किशोर नेहरकर, संतोष काकडे, चंद्रकांत गायकवाड उपस्थित होते.

जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील शेतकरी केळी या नगदी पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळू लागले आहेत. इथला शेतकरी मागील दोन वर्षांपासून निर्यातक्षम केळी उत्पादन करत आहे. कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र व डेक्कन व्हॅली शेतकरी उत्पादक कंपनी, सह्याद्री फार्म्स नाशिक, यांच्या माध्यमातून केळी पिकामध्ये एकात्मिक मुल्यसाखळी उभी करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील प्रशासन प्रभावी कामगिरी करत आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून क्लस्टर डेव्हलपमेंटमधून केळी उत्पादक शेतकऱ्यांना सर्व सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल निर्यात करून त्याचे अधिकाधिक मूल्य शेतकऱ्यांना मिळवून देण्याचा मानस आहे.

- माऊली खंडागळे, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, जुन्नर

जुन्नर परिसरात एकही औद्योगिक वसाहत नाही. त्यामुळे येथील हवा व पाणी शुद्ध आहे व येथील शेतकरी हा जैविक निविष्ठांचा वापर प्रभावी करत असल्याने भविष्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच चांगले दिवस येतील.

- अजय बेल्हेकर, संचालक, डेक्कन व्हॅली एफपीसी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT