Kisan Rail Agrowon
ॲग्रो विशेष

Kisan Rail News: शेतकऱ्यांच्या हितासाठी किसान रेल पुन्हा सुरू करा, अन्यथा ७ ऑक्टोबरला ठिय्या आंदोलन; स्वतंत्र भारत पक्षाचा इशारा

Swatantra Bharat Paksha : नगर, पुणे, सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फळं, फुलं आणि भाजीपाला पिकतो. पण योग्य सोय नसल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. यासाठी किसान रेल सुरू करा, अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाने केली आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्याच्या अहमदनगर, पुणे, सोलापूर जिल्ह्यात फळं, फुलं आणि भाजीपाला शेतीचे प्रमाण अधिक आहे. मात्र येथे किसान रेल बंद असून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी किसान रेल पुन्हा सुरू करावी, अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाने केली आहे. याच मागणीसाठी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ७ ऑक्टबर रोजी ठिय्या आंदोलन केले जाईल, असा इशाराही यावेळी स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली आहे.

राज्याच्या अहमदनगर, पुणे, सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी उत्तर भारतात व पूर्वेकडच्या राज्यांमध्ये माल पाठवतात. पण आता किसान रेल बंद असल्याने नुकसान होत आहे. ते नुकसान थांबवावे, असे निवेदन स्वतंत्र भारत पक्ष, जन संसद संघटना व पीपल्स हेल्पलाईन यांनी दिले आहे. तर या निवेदनातून किसान रेल पुन्हा सुरू करावी, अशीही मागणी करण्यात आली होती.

तसेच सध्या किसान रेल बंद असल्याने शेतकऱ्यांना त्यांचा माल जलद प्रवासी गाड्यांमधून पाठवावा लागत आहे. या गाड्यांमध्ये फक्त अर्धाच डब्बा पार्सलसाठी असतो. यातही स्टील, लोखंड, गाड्यांचे सुटे भाग भरलेले असतात. यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा माल भरता येत नाही. तर भरलाच तर तो खराब होतो. तसेच माल चाढवणारे ठेकेदार शेतकऱ्यांकडून मालाची चढ उतार करण्यासाठी अव्वाचे सव्वा हमाली घेतात. यातूनही शेतकऱ्यांची पिळवणूक होते, असे घनवट यांनी म्हटले आहे.

त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने बंद केलेल्या किसान रेल्वे पुन्हा सुरू कराव्यात. खरच गरज आहे अशा ठिकाणी किसान रेल सुरू करावी, अशी मागणी देखील घनवट यांनी केली आहे. तर केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा हिताचा विचार करावा यासाठी अहमदनगर कार्यालयासमोर एक दिवसीय ठिय्या आंदोलन केले जाणार आहे. हे आंदोलन ७ ऑक्टोंबर रोजी केले जाणार असल्याचे घनवट यांनी म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT